लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : साहित्य, कला, संगीत अशा कलाक्षेत्रातील सर्व विभागांना हात घालत राज्यातील विविध विद्यापीठातील युवकांनी आपली कला सादर केली़ यातील अनेक विद्यापीठांनी पारितोषिकेही मिळविली़ या गुणवंत युवक कलाकारांनी गाजविलेल्या इंद्रधनुष्य युवक महोत्सवाची गुरुवारी दिमाखदार सोहळ्याने सांगता झाली़ समारोहासाठी युवकांचा उत्साह शिगेला पोहचला होता़ प्रत्यक्ष पारितोषिक वितरण सोहळ्याच्या प्रसंगी ढोल, ताशांचा गजर आणि नृत्याची झलक दाखवित विजेत्या स्पर्धकांनी पारितोषिके स्वीकारल्याने या सोहळ्याला चार चाँद लागले़
परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाला १५ व्या राज्यस्तरीय आंतर विद्यापीठ इंद्रधनुष्य युवक महोत्सवाचे यजमानपद यावर्षी मिळाले़ विद्यापीठाने सांस्कृतिक नगरीला साजेसे आयोजन करीत पाच दिवसांपासून हा महोत्सव यशस्वीरित्या पार पाडला़ या महोत्सवाचा गुरुवारी समारोप झाला़
एकूण २४ कलाप्रकारांमध्ये विद्यार्थ्यांनी कलेचे सादरीकरण केले़ प्रत्येक स्पर्धेतील विजेत्याला मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिकाचे वितरण करण्यात आले़ दुपारी २ वाजता या सोहळ्याला प्रारंभ झाला़ खा़ बंडू जाधव, विद्यापीठाचे कुलगुरु डॉ़ बी़ व्यंकटेस्वरलू, शिक्षण संचालक डॉ़ विलास पाटील, विद्यापीठाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी तथा युवक महोत्सवाचे मुख्य संयोजक डॉ़ महेश देशमुख, संशोधन संचालक डॉ़ दत्तप्रसाद वासकर, राज्यपाल नियुक्त स्पर्धा निरीक्षक डॉ़ अनिल पाटील, डॉ़ अजय देशमुख, डॉ़ पी़जी़ इंगोले, कुलसचिव दिनेश धोंडे, कुलसचिव गजेंद्र लोंढे, विद्यापीठ अभियंता डॉ़ ए़एस़ कडाळे, विद्यापीठ निमंत्रक विनोद गायकवाड़, एस़ए़ चव्हाण, प्रवीण भोळे आदींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले़ मुंबई विद्यापीठाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावत या युवक महोत्सवावर आपले नाव कोरले़ तर कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठानेही सर्वसाधारण विजेतेपद पटकावित स्पर्धेत वर्चस्व निर्माण केले़
महोत्सवात वाङमय, फाईन आर्ट, संगीत, नृत्य, थिएटर या गटांत २४ उपकला प्रकारांच्या स्पर्धा पार पडल्या़ विजेत्या स्पर्धकांची अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय नावे अशी-
वाङमय कला प्रकार- वाद-विवाद स्पर्धा- सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे, मफ़ुले विद्यापीठ राहुरी, मुंबई विद्यापीठ, वक्तृत्व स्पर्धा- राष्ट्र संत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, मुंबई विद्यापीठ़ प्रश्न मंजुषा-सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे, मुंबई विद्यापीठ, डॉ़ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली़
फाईन आर्ट : स्थळचित्र स्पर्धा (आॅन द स्पॉट पेंटींग) सोलापूर विद्यापीठ सोलापूर, सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी़ कोलाज (चिकटकला)- शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, मुंबई विद्यापीठ, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव.
पोस्टर मेकींग स्पर्धा- शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, मुंबई विद्यापीठ, डॉ़ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड (विभागून)़ मातीकला- उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, कवी कुलगुरु कालीदास विद्यापीठ रामटेक व एसएनडीटी विद्यापीठ मुंबई (विभागून)़ व्यंगचित्र- एसएनडीटी विद्यापीठ, मुंबई़, डॉ़ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद, स्वारातीम विद्यापीठ नांदेड व मुंबई विद्यापीठ (विभागून)़
स्थळ छायाचित्र स्पर्धा : कवी कुलगुरु कालीदास विद्यापीठ रामटेक, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, डॉ़ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर (विभागून)़ रांगोळी स्पर्धा : मुंबई विद्यापीठ, एसएनडीअी विद्यापीठ मुंबई, कवी कुलगुरु कालीदास विद्यापीठ रामटेक व डॉ़ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला (विभागून)़
संगीत विभाग : पाश्चिमात्य समूह संगीत- मुंबई विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, एसएनडीअी विद्यापीठ मुंबई, लोकसंगीत वाद्यवृंद स्पर्धा- शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, स्वारातीम विद्यापीठ नांदेड, मुंबई विद्यापीठ़
भारतीय समूह गीत स्पर्धा -मुंबई विद्यापीठ, एसएनडीटी विद्यापीठ मुंबई, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व स्वारातीम विद्यापीठ नांदेड (विभागून), पाश्चिमात्य वैयक्तीक गाायन- मुंबई विद्यापीठ, एसएनडीटी विद्यापीठ मुंबई, सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे, सुगम संगीत स्पर्धा- मुंबई विद्यापीठ, स्वारातीम विद्यापीठ नांदेड, बाळासाहेब सावंत कोकण विद्यापीठ दापोली. शास्त्रीय वाद्य संगीत (स्वरवाद्य)- शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे, स्वारातीम विद्यापीठ नांदेड़ शास्त्रीय तालवाद्य स्पर्धा- शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक, मुंबई विद्यापीठ़ भारतीय शास्त्रीय गायन- मुंबई विद्यापीठ, एसएनडीटी विद्यापीठ मुंबई, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूऱ


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.