भाजपात इनकमिंग सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 11:57 PM2017-08-16T23:57:27+5:302017-08-16T23:57:27+5:30

स्थानिक आमदारांच्या कार्यपद्धतीवर टीका करत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मिलिंद देशमुख यांच्यापाठोपाठ सेनचे महानगराध्यक्ष बाळू खोमणे यांनीही आपल्या पदाचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला आहे.

BJP Incoming | भाजपात इनकमिंग सुरुच

भाजपात इनकमिंग सुरुच

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: स्थानिक आमदारांच्या कार्यपद्धतीवर टीका करत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मिलिंद देशमुख यांच्यापाठोपाठ सेनचे महानगराध्यक्ष बाळू खोमणे यांनीही आपल्या पदाचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला आहे. मुंबईत बुधवारी भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत ११ नगरसेवक आणि शिवसेनेच्या दोन पदाधिकाºयांनी भाजपामध्ये प्रवेश घेतला आहे.
विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीनंतर माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील, माजी राज्यमंत्री डॉ़माधवराव किन्हाळकर, माजी खा़भास्करराव पाटील खतगावकर, सुभाष वानखेडे, माजी आ़ओमप्रकाश पोकर्णा आदी प्रमुख नेत्यांनी भाजपात प्रवेश घेतला होता़ नांदेडमध्ये १४ आॅगस्ट रोजी काँग्रेसच्या ४, सेनेच्या ४ आणि राष्टÑवादीच्या २ नगरसेवकांनी आपल्या पदाचे राजीनामे देत भाजपाची वाट धरली होती. त्यात काँग्रेसच्या नवल पोकर्णा यांनीही आपल्या पदाचा राजीनामा देऊन ही संख्या ११ वर नेली. १४ आॅगस्ट रोजीच शिवसेनेचे नांदेड उत्तरचे जिल्हाप्रमुख मिलिंद देशमुख यांनी सेनेला जय महाराष्टÑ केला होता. त्यात बुधवारी महानगराध्यक्ष बाळू खोमणे यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला. १८ वर्षे शाखाप्रमुख ते महानगराध्यक्ष, विरोधी पक्षनेता आदी पदांवर काम केले़ मात्र विद्यमान सेना आमदारांकडून कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी होत आहे़ याबाबत वरिष्ठांना कळवूनही काही झाले नाही़ परिणामी आपल्याला पक्ष सोडावा लागत असल्याचे खोमणे यांनी सांगितले़
मुंबईमध्ये शिवसेनेचे हे दोन पदाधिकारी आणि ११ नगरसेवकांना भाजपामध्ये प्रवेश देण्यात आला. भाजपच्या दादर येथील पक्ष कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, भाजपाचे केंद्रीय सहसंघटनमंत्री व्ही. सतीश, महापालिका निवडणूक प्रभारी तथा कामगारमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, आ. सुजितसिंह ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला.
भाजपामध्ये प्रवेश घेणाºयांमध्ये काँग्रेसचे नगरसेवक सरजितसिंघ गिल, किशोर यादव, अन्नपूर्णा ठाकूर, स्नेहा पांढरे आणि नवल पोकर्णा यांचा तर शिवसेनेचे नगरसेवक दीपकसिंह रावत, विनय गुर्रम, वैशाली देशमुख, ज्योती खेडकर तसेच राष्ट्रवादीचे नगरसेवक संदीप चिखलीकर व श्रद्धा चव्हाण यांचा समावेश आहे. मनसेचे माजी जिल्हाप्रमुख विनोद पावडे यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला आहे.
या प्रवेश सोहळ्यास भाजपा महानगराध्यक्ष संतुकराव हंबर्डे, आ. तुषार राठोड, माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा, दिलीप कंदकुर्ते, चैतन्य देशमुख, श्यामसुंदर शिंदे, प्रवीण साले, संजय कौडगे, डॉ. अजित गोपछडे आदींची उपस्थिती होती.
त्याचवेळी सिडकोतील राष्टÑवादीच्या नगरसेविका इंदुताई घोगरे आणि शिवसेनेच्या नगरसेविका सुदर्शना खोमणे यांचे राजीनामेही जवळपास निश्चित असून या दोन्ही नगरसेविकांच्या कुटुंबियांनी मुंबईमध्ये झालेल्या सोहळ्यात भाजपामध्ये प्रवेश केला आहे.

Web Title: BJP Incoming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.