बीड बसस्थानक नूतनीकरणाचा ‘प्लॅन’ जुळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2017 12:53 AM2017-11-03T00:53:35+5:302017-11-03T00:53:39+5:30

बीड बसस्थानकाच्या नूतनीकरणाचा प्रश्न अद्यापही रखडलेलाच आहे.

Bid bus station renewal plan 'Junk' | बीड बसस्थानक नूतनीकरणाचा ‘प्लॅन’ जुळेना

बीड बसस्थानक नूतनीकरणाचा ‘प्लॅन’ जुळेना

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : बीड बसस्थानकाच्या नूतनीकरणाचा प्रश्न अद्यापही रखडलेलाच आहे. एका खाजगी कंपनीने पाहणी करून ‘प्लॅन’ मध्यवर्ती कार्यालयाकडे दिलेला आहे; परंतु येथे याबाबत कसलाही निर्णय न घेता नूतनीकरणाचा आराखडा धूळ खात पडून आहे. त्यामुळे आजही बसस्थानकात प्रवाशांसह कर्मचा-यांना त्रास सहन करावा लागत आहे.
काही वर्षांपूर्वी जीवनराव गोरे अध्यक्ष असताना बीड बसस्थानकाच्या नूतनीकरणाचे कामी बीओटी तत्त्वावर देण्यात आले होते. याचा नारळही खुद्द गोरे यांच्यासह मंत्री, खासदार, आमदारांच्या उपस्थितीत फुटला होता; परंतु त्यानंतर सरकार बदलले अन् शिवसेनेचे दिवाकर रावते यांनी पदभार स्वीकारला. रावते यांनी बीओटी तत्त्वावरील सर्व कामांना स्थगिती देण्याचे आदेश दिले. यामध्ये बीडचाही समावेश होता. संबंधित कंत्राटदाराने याविरोधात न्यायालयात धावही घेतली. त्याचा निर्णय समजू शकला नाही.
विभागीय कार्यालयाकडून पाठपुरावा सुरू असतानाही मध्यवर्ती कार्यालयाकडून बीड बसस्थानकाच्या नूतनीकरणासंदर्भात कसल्याही हालचाली होत नसल्याचे समोर आले आहे. त्यांच्या उदासीनतेमुळेच बीड बसस्थानकाच्या सुशोभीकरणाला खीळ बसली आहे. या स्थानकाच्या नूतनीकरणावर तात्काळ कारवाई करून प्रत्यक्ष कामास सुरुवात करावी व कर्मचाºयांसह प्रवाशांचे होणारे हाल थांबवावेत, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Web Title: Bid bus station renewal plan 'Junk'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.