बब्रूवान रुद्रकंठावार म्हणाले, उपहासाचे चीज झाले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 01:17 AM2017-12-12T01:17:08+5:302017-12-12T01:19:19+5:30

‘मी लिहीत असलेल्या उपहासाचे चीज झाले,’ अशी प्रांजळ प्रतिक्रिया बब्रूवान रुद्रकंठावार यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. त्यांच्या ‘आदमी विदाऊट पार्टी’ या पुस्तकाला मराठी भाषा विभागाच्या वतीने दिला जाणारा ‘श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार’ जाहीर झाल्यानंतर ते बोलत होते.

Bibruwan Rudrakanthawar said, "It was a scary thing ... | बब्रूवान रुद्रकंठावार म्हणाले, उपहासाचे चीज झाले...

बब्रूवान रुद्रकंठावार म्हणाले, उपहासाचे चीज झाले...

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : ‘मी लिहीत असलेल्या उपहासाचे चीज झाले,’ अशी प्रांजळ प्रतिक्रिया बब्रूवान रुद्रकंठावार यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. त्यांच्या ‘आदमी विदाऊट पार्टी’ या पुस्तकाला मराठी भाषा विभागाच्या वतीने दिला जाणारा ‘श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार’ जाहीर झाल्यानंतर ते बोलत होते.

त्यांचे मूळ नाव धनंजय चिंचोलीकर. ‘बब्रूवान रुद्रकंठावार’ या नावाने त्यांनी १९९८ पासून लिहिण्यास सुरुवात केली. ‘पुन्यांदा चबढब’ हे सदर ते वर्तमानपत्रात लिहीत. पुढे याच नावे लेखांचे पुस्तक प्रकाशित झाले. राजकीय-सामाजिक विषयावरील उपहास आणि भाषेच्या पातळीवर केलेले विविध प्रयोग ही त्यांच्या लिखाणाची वैशिष्ट्ये आहेत. मराठी वाङ्मयातील वैशिष्ट्यपूर्ण असे उपहासगर्भ लेखन करणारा प्रयोगशील लेखक म्हणून बब्रूवान प्रसिद्ध आहेत. मराठी भाषेत इंग्रजी शब्दांचा अत्यंत खुबीने वापर करून स्वत:ची अशी एक आगळीवेगळी शैली त्यांनी घडविली आहे. सोशल मीडियावर ते सातत्याने लिखाण करतात.

‘बर्ट्रांड रसेल वुईथ देशी फिलॉसॉफी’, ‘टºर्या, डिंग्या आन् गळे’ ही पुस्तके, तर पत्रकारितेच्या क्षेत्रावरील ‘चौथ्या इस्टेटच्या बैलाला’ हे नाटक त्यांनी लिहिले
आहे. जनशक्ती वाचक चळवळ प्रकाशित ‘आदमी विदाऊट पार्टी’ हे त्यांचे पाचवे पुस्तक आहे. यामध्ये त्यांनी राजकीय, सामाजिक, वाङ्मय, पत्रकारिता अशा विविध विषयांवर उपहासाच्या अंगाने चर्चा केली आहे.


साहित्यिकांच्या लेखनाला पुरस्कारांमुळे मान्यता मिळते
मला वाङ्मय पुरस्कार जाहीर झाल्याचे ‘लोकमत’कडूनच कळले. लेखक, कवी आणि साहित्यिकांच्या लेखनाला अशा पुरस्कारांमुळे मान्यता मिळते आणि यातूनच त्यांना प्रेरणा मिळते. यापूर्वीही माझ्या आठ पुस्तकांना वाङ्मय पुरस्कार मिळालेला आहे. - डॉ. जनार्दन वाघमारे

 


खूप आनंद वाटला
पुरस्कार मिळाल्यामुळे ‘मातंग चळवळींचा इतिहास’ हे पुस्तक अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. या पुस्तकात दलित महासंघ, लहुजी साळवे कर्मचारी कल्याण महासंघ, अण्णाभाऊ साठे फाऊं डेशन अशा विविध संघटनांच्या कार्याचा आढावा घेतला आहे. त्याला शासनाने पुरस्कार दिला, याचा खूप आनंद वाटला.
- डॉ. सुरेश चौथाईवाले
 

पुरस्कार उपेक्षित समाजातील मुलांना समर्पित
बालनाटकांच्या विषयांमध्ये बदल होऊन ते समाजाभिमुख होणे आवश्यक आहे. उपेक्षित समाजातील मुलांचं भावविश्व रंगभूमीवर आलं पाहिजे. हा पुरस्कार उपेक्षित समाजातील प्रतिकूलतेशी संघर्ष करणाºया मुलांना समर्पित. बाल रंगभूमीने आपल्या परंपरागत, बालिश विषयातून बाहेर येणे आवश्यक आहे.
- डॉ. सतीश साळुंके

 


केलेल्या कामाचा सन्मान
शिक्षण क्षेत्रात केलेल्या कामाची सरकारने दखल घेतलेल्याचा आनंद आहे. जे काही अनुभव या क्षेत्रात काम करत असताना आले, ते मी शब्दबद्ध केले होते. ज्ञानरचनावाद हा उपक्रमसुद्धा मला यातूनच राबविणे शक्य झाले. साहित्यामध्ये मिळालेला पुरस्कार हा केलेल्या कामाचा सन्मान आहे.
- डॉ. पुरुषोत्तम भापकर, विभागीय आयुक्त

Web Title: Bibruwan Rudrakanthawar said, "It was a scary thing ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.