बेगमपुरा पोलिसांचा कुंटणखान्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 01:31 AM2018-02-21T01:31:33+5:302018-02-21T01:31:39+5:30

आसेफिया कॉलनी येथील छुप्या पद्धतीने चालणा-या कुंटणखान्यावर बेगमपुरा पोलिसांनी छापा मारून कुटंणखाना चालविणा-या ३८ वर्षीय महिलेला अटक केली

 Begampura police raid on brothell | बेगमपुरा पोलिसांचा कुंटणखान्यावर छापा

बेगमपुरा पोलिसांचा कुंटणखान्यावर छापा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : आसेफिया कॉलनी येथील छुप्या पद्धतीने चालणा-या कुंटणखान्यावर बेगमपुरा पोलिसांनी छापा मारून कुटंणखाना चालविणा-या ३८ वर्षीय महिलेला अटक केली असून, तिच्या ताब्यातून तीन मोबाईल, निरोध पाकिटांसह १३ हजार ५०० रुपयांचा माल जप्त केला आहे.
सदर महिला ग्राहक उपलब्ध करून खोली व महिला पुरविण्याचे काम करीत होती. ग्राहकांकडून १,५०० रुपये घेऊन इतर महिलेकडून वेश्या व्यवसाय करून घेत होती. महिलेला त्या बदल्यात ५०० रुपये देत होती. कुंटणखान्यावर एका महिलेसह ती पोलीस छाप्यात आढळून
आली.
पोलीस निरीक्षक राजश्री आडे, फौजदार राहुल रोडे, शेख शमा,
देवा सूर्यवंशी, सपकाळ, पाठक,
धुंदळे यांनी हा छापा मारला. याप्रकरणी बेगमपुरा पोलीस ठाण्यात पिटा अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
‘त्या’ आंटीची न्यायालयीन
कोठडीत रवानगी
बेगमपुरा पोलिसांनी जयभवानी, आसेफिया कॉलनी येथील देह व्यापाराच्या केंद्रावर छापा मारून आंटीसह एका महिलेला ताब्यात घेतले होते. ‘त्या’ आंटीला मंगळवारी (दि.२०) न्यायालयात हजर करण्यात आले असता तिची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचा
आदेश देण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजश्री आडे यांनी दिली.

Web Title:  Begampura police raid on brothell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.