लोकमत महामॅरेथॉन मार्गाचा वापर टाळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 12:54 AM2017-12-16T00:54:46+5:302017-12-16T00:54:49+5:30

१७ डिसेंबर रोजी लोकमत समूहातर्फे राज्यस्तरीय महामॅरेथॉन स्पर्धेचे शहरात आयोजन करण्यात आले. या मॅरेथॉनमध्ये हजारो नागरिक धावणार असल्याने पहाटे ५ ते १०.३० वाजेदरम्यान स्पर्धेच्या मार्गाचा वापर वाहनचालकांनी टाळावा, असे आवाहन पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी केले.

 Avoid using Lokmat Mahamarthathan Road | लोकमत महामॅरेथॉन मार्गाचा वापर टाळावा

लोकमत महामॅरेथॉन मार्गाचा वापर टाळावा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : १७ डिसेंबर रोजी लोकमत समूहातर्फे राज्यस्तरीय महामॅरेथॉन स्पर्धेचे शहरात आयोजन करण्यात आले. या मॅरेथॉनमध्ये हजारो नागरिक धावणार असल्याने पहाटे ५ ते १०.३० वाजेदरम्यान स्पर्धेच्या मार्गाचा वापर वाहनचालकांनी टाळावा, असे आवाहन पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांनी केले.
लोकमत समूहातर्फे १७ डिसेंबर रोजी राज्यस्तरीय हाफ महामॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विभागीय क्रीडा संकुल येथून या स्पर्धेला प्रारंभ होईल. ३ किलोमीटरची मॅरेथान विभागीय क्रीडा संकुल येथून सुरू होऊन शहानूरमियाँ दर्गा चौक, रोपळेकर चौक येथून परत विभागीय क्रीडा संकुल येथे
पोहोचेल.
पाच कि़मी.साठी विभागीय क्रीडा संकुल येथून प्रारंभ होईल आणि शहानूरमियाँ दर्गा चौक, रोपळेकर चौक, काल्डा कॉर्नर येथून परत विभागीय क्रीडा संकुल असा मार्ग आहे, तर दहा कि़मी.च्या मॅरेथॉॅन विभागीय क्रीडा संकुल, शहानूरमियाँ दर्गा चौक, रोपळेकर चौक, काल्डा कॉर्नर, अमरप्रीत चौक, मोंढानाका पुलाखालून आकाशवाणी, सेव्हन हिल उड्डाणपुलाखालून लोकमत भवनसमोरून, हॉटेल लेमन ट्रीपासून यू टर्न घेऊन परत सेव्हन हिल, गजानन महाराज मंदिर चौक, विभगाीय क्रीडा संकुल येथे परत येईल.
२१ किलोमीटरची मॅरेथॉन विभागीय क्रीडा संकुल येथून निघून शहानूरमियाँ दर्गा चौक, रोपळेकर चौक, काल्डा कॉर्नर, अमरप्रीत चौक, क्रांतीचौक उड्डाणपुलाखालून, सतीश मोटार्स चौक, वीर सावरकर चौक, निरालाबाजार, महात्मा फुले चौक, खडकेश्वर चौक, मिल कॉर्नर, ज्युबिलीपार्क चौक, टाऊन हॉल उड्डाणपुलावरून आमखास मैदान, अण्णाभाऊ साठे चौक, दिल्ली गेट, हडको कॉर्नर, सिद्धार्थ चौक, टी.व्ही. सेंटर चौक, आय.पी. मेस चौक, बळीराम पाटील शाळा चौक, बजरंग चौक, वोखार्ट चौक, जळगाव टी पॉइंट मार्गे सेव्हन हिल पुलाखालून गजानन महाराज मंदिर चौकमार्गे गारखेडा रोडने विभागीय क्रीडा संकुल असा मार्ग आहे. पहाटे साडेपाच ते साडेदहा या कालावधीत ही मॅरेथॉन होईल.
या मार्गावर धावणाºया स्पर्धकांना रस्त्यावरील वाहनांमुळे अपघात होण्याचा धोका आहे. यामुळे कर्तव्यावरील वाहतूक शाखेचे अधिकारी कर्मचारी वेळेवर वाहतूक व्यवस्थेत बदल करतील, त्यांना वाहनचालकांनी सहकार्य करावे अथवा मॅरेथॉनच्या मार्गावरून जाणे शक्यतो वाहनचालकांनी टाळावे,
असे आवाहन पोलीस आयुक्त
यशस्वी यादव आणि वाहतूक शाखेचे सहायक आयुक्त सी.डी. शेवगण
यांनी केले. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

Web Title:  Avoid using Lokmat Mahamarthathan Road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.