औरंगाबादेत महात्मा बसवेश्वरांचा जयघोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 12:27 AM2018-04-19T00:27:26+5:302018-04-19T00:29:10+5:30

पारंपरिक वेशभूषा आणि डोक्यावर पारंपरिक फेटा अन् टोपी, बॅण्ड पथक, टाळ-मृदंगाचा गजर आणि सोबत ‘महात्मा बसवेश्वर महाराज की जय’, ‘हरहर महादेव’ असा होणारा जयघोष, अशा उत्साहपूर्ण वातावरणात भव्य शोभायात्रा काढून बुधवारी (दि. १८) जगत््ज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

Auspiciousness of Mahatma Basaveshwar in Aurangabad | औरंगाबादेत महात्मा बसवेश्वरांचा जयघोष

औरंगाबादेत महात्मा बसवेश्वरांचा जयघोष

googlenewsNext
ठळक मुद्देशोभायात्रा : महात्मा बसवेश्वर यांची जयंती शहरात उत्साहात साजरी

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : पारंपरिक वेशभूषा आणि डोक्यावर पारंपरिक फेटा अन् टोपी, बॅण्ड पथक, टाळ-मृदंगाचा गजर आणि सोबत ‘महात्मा बसवेश्वर महाराज की जय’, ‘हरहर महादेव’ असा होणारा जयघोष, अशा उत्साहपूर्ण वातावरणात भव्य शोभायात्रा काढून बुधवारी (दि. १८) जगत््ज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.


जगत््ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा उत्सव समितीतर्फे सायंकाळी फकीरवाडी येथील संगमेश्वर मठापासून ही शोभायात्रा काढण्यात आली. यावेळी सजवलेल्या चांदीच्या रथामध्ये अग्रभागी महात्मा बसवेश्वरांचा पुतळा आणि त्यामागे महात्मा बसवेश्वरांची वेशभूषा साक ारून विराजमान युवक हे मिरवणुकीतील मुख्य आकर्षण ठरले. प्रारंभी महात्मा बसवेश्वरांची पूजा करण्यात आली. शोभायात्रेच्या अग्रभागी महिला भजनी मंडळ, त्यापोठापाथ बँड पथक, अश्वारूढ पुरुष आणि रथ होता. टाळ-मृदंगाचा गजर आणि बसवण्णांचा जयघोष करून मंगलमय वातावरणात शोभायात्रेला सुरुवात झाली. बॅण्ड पथकाकडून सादर होणाऱ्या एकापेक्षा एक सरस गीतांनी शोभायात्रेत जल्लोष भरला. पानदरिबा, संस्थान गणपती, शहागंज, सिटीचौक, मछली खडक, गुलमंडी, दिवाण देवडीमार्गे फकीरवाडी येथे शोभायात्रेचा समारोप झाला.
याप्रसंगी जगत््ज्योती महात्मा बसवेश्वर जयंती जिल्हा उत्सव समितीचे अध्यक्ष वीरभद्र गादगे, ज्ञानेश्वरअप्पा खर्डे, सचिन संगशेट्टी, समितीचे कार्याध्यक्ष संजय दारूवाले, कोषाध्यक्ष आशिष लकडे, शेखर कोठुळे, सचिव कैलास पाटील, बसवराज निंबुर्गे, देवीदासअप्पा उंचे, विलास संभाहरे, प्रदीप बुरांडे, शिवा खांडखुळे, राजेश कोठाळे, पंकज वाडकर, शिवा गुळवे, राजू लकडे, अभिजित घेवारे, शिवानंद मोधे, रोहित स्वामी, विराज शेटे, वैभव मिटकरी, सुनील ठेंगे, राधाकृष्ण गवंडर, परशुराम मोधे, जगदीश कोठाळे, सागर कळसणे, गणेश कोठाळे, नंदू गवंडर, संतोष लिंभारे, अनिल मोधे, कौस्तुभ कोठुळे, प्रमोद गुळवे, मनोज गवंडर, शैलेश मुळे, स्वप्नील सुपारे, नितीन मोठे, ऋषिकेश वाळेकर, शिवा लुंगारे, दीपक उरगुंडे, दत्तात्रय तुपकरी, नगरसेविका शिल्पाराणी वाडकर, चंपा झुंजारकर, सुंदर सुपारे, आशा तिळकरी, सरला वाळेकर, सविता दारुवाले, योगिता काठोळे, अरुणा कोठाळे आदींसह मोठ्या संख्येने समाजबांधवांची उपस्थिती होती. संगमेश्वर मठात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
ठिकठिकाणी रांगोळी, फुगडी
शोभायात्रेत पुरुष, युवकांसह फेटे बांधून मोठ्या संख्येने महिला, युवती सहभागी झाल्या होत्या. यावेळी महिला आणि युवतींनी शोभायात्रेत फुगडी खेळली, तर अनेक पुरुष, युवकांनी बँड पथकाच्या तालावर ठेका धरला. शोभायात्रेच्या मार्गात ठिकठिकाणी रांगोळी काढण्यात आली होती. शोत्रायात्रा मार्गात होणारी विद्युत रोषणाई आणि चांदीच्या रथाने शहरवासीयांचे लक्ष वेधले.
शिवा संघटनेने काढलेल्या वाहन रॅलीने वेधले लक्ष
औरंगाबाद : जगत्ज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी (दि.१८) महात्मा बसवेश्वर चौकातून (आकाशवाणी) दुचाकी रॅली काढण्यात आली. यावेळी रॅलीत फुलांनी सजविलेल्या चांदीच्या रथात अक्कमा देवी आणि महात्मा बसवेश्वरांची वेशभूषा साकारलेल्या बालकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
जगत््ज्योती महात्मा बसवेश्वर जयंती जिल्हा उत्सव समितीतर्फे सकाळी महात्मा बसवेश्वर चौक येथे महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन आणि ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी खा. चंद्रकांत खैरे, महापौर नंदकुमार घोडेले, सभागृह नेते विकास जैन, सभापती गजानन बारवाल, नगरसेवक राजू वैद्य, मकरंद कुलकर्णी, सचिन खैरे, ऋषिकेश खैरे, किशोर नागरे, नगरसेविका शोभा बुरांडे, शिल्पाराणी वाडकर, शिवसेना शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी, उद्योजक बसवराज मंगरुळे, जयप्रकाश गुदगे, जिल्हा उत्सव समितीचे अध्यक्ष वीरभद्र गादगे, ज्ञानेश्वरअप्पा खर्डे आदींची उपस्थिती होती.
खा. खैरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. नंतर दुचाकी रॅली काढण्यात आली. यावेळी दुचाकींना लावलेले भगवे ध्वज, डोक्यावर पारंपरिक टोपी, फेटा आणि महात्मा बसवेश्वरांचा जयघोष, अशा वातावरणात ही रॅली रवाना झाली. यामध्ये महिला-पुरुष, युवक-युवतींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. क्रांतीचौक, संत एकनाथ रंगमंदिर, ज्योतीनगर, चेतक घोडा, त्रिमूर्ती चौक, पुंडलिकनगर, जयभवानीनगर, सिडको बसस्थानक, कॅनॉट प्लेस, बजरंग चौकमार्गे टीव्ही सेंटर येथील स्वामी विवेकानंद उद्यानातील महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याच्या नियोजित जागेवर रॅलीचा समारोप झाला.

Web Title: Auspiciousness of Mahatma Basaveshwar in Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.