औरंगाबादची कचराकोंडी फुटणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 12:41 AM2018-07-15T00:41:44+5:302018-07-15T00:42:41+5:30

शहरात मागील पाच महिन्यांपासून साचलेला हजारो टन कचरा कुठे टाकायचा याबाबतची कोंडी फुटण्याची चिन्हे आहेत. महापालिका आणि कन्नडचे शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी यासाठी सकारात्मक पुढाकार घेतला आहे.

Aurangabad's trash can break? | औरंगाबादची कचराकोंडी फुटणार?

औरंगाबादची कचराकोंडी फुटणार?

googlenewsNext
ठळक मुद्दे४० कि.मी.अंतर : हर्षवर्धन जाधव यांचा पुढाकार, मनपाकडून जागेची पाहणी

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहरात मागील पाच महिन्यांपासून साचलेला हजारो टन कचरा कुठे टाकायचा याबाबतची कोंडी फुटण्याची चिन्हे आहेत. महापालिका आणि कन्नडचे शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी यासाठी सकारात्मक पुढाकार घेतला आहे. औरंगाबाद शहरातील सर्व कचरा ४० कि. मी. अंतरावर कन्नड तालुक्यात नेऊन प्रक्रिया करणार आहेत. या कचऱ्यापासून तयार होणारे खत शेतक-यांना मोफत देण्यात येईल. महापालिका अधिका-यांनीही ७० एकर जागेची पाहणी केली. रविवारपासून दररोज ५० ट्रक कचरा उचलून नेण्यात येणार आहे.
शहरात दररोज ४०० मेट्रिक टन कचरा जमा होतो. १६ फेबु्रवारीपासून नारेगाव येथे कचरा टाकण्यास बंदी घालण्यात आली आहे. मागील १४९ दिवसांपासून शहरात कचरा पडून आहे. आतापर्यंत २५ हजार मेट्रिक टन कचरा साचला आहे. मध्यवर्ती जकात नाका, हर्सूल, पडेगाव येथे कचºयाचे मोठमोठे डोंगर तयार झाले आहेत. कचरा टाकण्यास नागरिकांकडून होणाºया विरोधामुळे महापालिकेचीही कोंडी झाली आहे. या कोंडीतून मार्ग निघणार असे चित्र सध्या तरी दिसत आहे.
तीन जागांची पाहणी
औरंगाबाद शहरातील कचरा टाकण्यासाठी शनिवारी एकूण तीन जागांची पाहणी करण्यात आली. पिशोर भागातील कोळंबी येथील १२५ एकर गायरान जागा पाहण्यात आली. त्यानंतर औरंगाबाद शहरापासून थेट हायवेवर लागणारे हतनूरजवळील घुसूर येथील ७० एकर गायरान जागा कचरा टाकण्यासाठी संयुक्तिक वाटली. याशिवाय नागदजवळील वाघुळखेडा येथील ३० हेक्टर जागेची चाचपणी करण्यात आली.
कचºयावर प्रक्रिया करणार
औरंगाबाद शहरातील कचरा भौैगोलिकदृष्ट्या कन्नड तालुक्यात नेण्यात येणार आहे. ज्याठिकाणी कचरा टाकण्यात येईल, तेथे महापालिका प्रक्रियाही करणार आहे. कचºयापासून तयार होणारा खत शेतकºयांना मोफत देण्याचा निर्णयही आ. जाधव यांनी घेतला.
कोणी तरी पुढाकार घ्यावा...
समर्थनगरसारख्या वॉर्डातील पन्नास टक्के नागरिक व्हायरल फिवरमुळे आजारी पडले आहेत. शहरात मागील पाच महिन्यांपासून कचरा साचला आहे. गंभीर रोगराई पसरण्याची भीती आहे. शहराच्या चांगल्यासाठी कोणाला तरी पुढाकार घेणे गरजेचे होते. मी कन्नड तालुक्यातील नागरिकांना विश्वासात घेऊन कचºयावर प्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आहे.
ल्ल हर्षवर्धन जाधव, आमदार, कन्नड

Web Title: Aurangabad's trash can break?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.