औरंगाबादचा सत्यम निकम महाराष्ट्र हॉकी संघाचा उपकर्णधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2018 01:09 AM2018-04-30T01:09:28+5:302018-04-30T01:10:31+5:30

भोपाळ येथे होणाऱ्या ज्युनिअर राष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी औरंगाबादचा प्रतिभावान खेळाडू सत्यम निकम हा महाराष्ट्र संघाचे उपकर्णधारपद भूषवणार आहे. त्याचप्रमाणे औरंगाबादची उद्योन्मुख खेळाडू पूनम वाणी हिचीदेखील महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे. पुणे येथे झालेल्या शिबिरातून या दोघांची निवड झाली आहे.

Aurangabad's Satyam Nikam is the vice-captain of the Maharashtra Hockey Association | औरंगाबादचा सत्यम निकम महाराष्ट्र हॉकी संघाचा उपकर्णधार

औरंगाबादचा सत्यम निकम महाराष्ट्र हॉकी संघाचा उपकर्णधार

googlenewsNext

औरंगाबाद : भोपाळ येथे होणाऱ्या ज्युनिअर राष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी औरंगाबादचा प्रतिभावान खेळाडू सत्यम निकम हा महाराष्ट्र संघाचे उपकर्णधारपद भूषवणार आहे. त्याचप्रमाणे औरंगाबादची उद्योन्मुख खेळाडू पूनम वाणी हिचीदेखील महाराष्ट्राच्या संघात निवड झाली आहे.
पुणे येथे झालेल्या शिबिरातून या दोघांची निवड झाली आहे. सत्यम निकम याने याआधीदेखील मणीपूर येथील सबज्युनिअर राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत महाराष्ट्राचे उपकर्णधारपद भूषवलेले आहे. तसेच सेंटर फॉरवर्ड पोझिशनवर खेळणाºया पूनम वाणी हिनेदेखील शालेय राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत आपला विशेष ठसा उमटवला आहे. या निवडीबद्दल औरंगाबाद जिल्हा हॉकी संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत जोशी, हॉकी महाराष्ट्राचे उपाध्यक्ष पंकज भारसाखळे, अशोक सायन्ना, डॅनियल फर्नांडिस, विनोद नरवडे, संजय चंद्रशेखर, शेख साजिद, पांडुरंग सर्पे, उज्ज्वला सातदिवे, शामसुंदर भालेराव, प्रदीप खांडरे, कपिल शेळके, सुयश पंडागळे आदींनी या दोघांचे अभिनंदन करीत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Web Title: Aurangabad's Satyam Nikam is the vice-captain of the Maharashtra Hockey Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Hockeyहॉकी