राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत औरंगाबादचा सत्यम भूषवणार महाराष्ट्राचे कर्णधारपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 12:40 AM2019-02-16T00:40:28+5:302019-02-16T00:42:35+5:30

विद्यापीठ परिसरातील साईच्या पश्चिम विभागीय केंद्रातील अ‍ॅस्ट्रोटर्फवर १७ फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या ज्युनिअर राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत औरंगाबादचा प्रतिभावान खेळाडू सत्यम निकम हा महाराष्ट्र संघाचे कर्णधारपद भूषवणार आहे. या स्पर्धेत यजमान महाराष्ट्राची सलामीची लढत उत्तर प्रदेश संघाविरुद्ध रंगणार आहे. हॉकी महाराष्ट्रचे सचिव मनोज भोरे यांनी राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र हॉकी संघाची शुक्रवारी घोषणा केली. विशेष म्हणजे औरंगाबादच्याच अमिद खान पठाण याचाही महाराष्ट्राच्या संघात समावेश करण्यात आला आहे.

Aurangabad's Satyam Bhushwaj is the captain of Maharashtra in the national hockey tournament | राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत औरंगाबादचा सत्यम भूषवणार महाराष्ट्राचे कर्णधारपद

राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत औरंगाबादचा सत्यम भूषवणार महाराष्ट्राचे कर्णधारपद

googlenewsNext
ठळक मुद्देयजमानांची सलामीची लढत होणार उत्तर प्रदेशविरुद्ध

औरंगाबाद : विद्यापीठ परिसरातील साईच्या पश्चिम विभागीय केंद्रातील अ‍ॅस्ट्रोटर्फवर १७ फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या ज्युनिअर राष्ट्रीय हॉकी स्पर्धेत औरंगाबादचा प्रतिभावान खेळाडू सत्यम निकम हा महाराष्ट्र संघाचे कर्णधारपद भूषवणार आहे. या स्पर्धेत यजमान महाराष्ट्राची सलामीची लढत उत्तर प्रदेश संघाविरुद्ध रंगणार आहे. हॉकी महाराष्ट्रचे सचिव मनोज भोरे यांनी राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र हॉकी संघाची शुक्रवारी घोषणा केली. विशेष म्हणजे औरंगाबादच्याच अमिद खान पठाण याचाही महाराष्ट्राच्या संघात समावेश करण्यात आला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रीय स्पर्धेत औरंगाबादच्या सत्यम निकम याने आपला विशेष ठसा उमटवला आहे. पुणे येथे नुकत्याच झालेल्या खेलो इंडिया क्रीडा स्पर्धेतही सत्यम निकम याने महाराष्ट्र संघाचे उपकर्णधारपद भूषवले होते. तसेच गतवर्षी मणीपूर येथे झालेल्या राष्ट्रीय हॉकी स्पर्धेतही त्याने महाराष्ट्र संघाच्या उपकर्णधारपदाची धुरा पार पाडली होती. जाहीर झालेल्या १८ सदस्यीय संघात सातारा, इस्लामपूर व नांदेड येथील खेळाडूंचाही समावेश करण्यात आला आहे. विविध शहरांतील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे यासाठी औरंगाबादच्या सत्यम निकम याच्याकडे कर्णधारपदाची धुरा सोपविण्यात आल्याचे हॉकी महाराष्ट्रचे सचिव मनोज भोरे यांनी सांगितले.
यजमान महाराष्ट्राचा क गटात समावेश करण्यात आला असून, त्यांची साखळी फेरीतील लढत गंगपूर-ओडिशा, उत्तर प्रदेश, दिल्ली आणि हॉकी संघाविरुद्ध होणार आहे. महाराष्ट्राची सलामीची लढत उत्तर प्रदेशविरुद्ध १७ फेब्रुवारी रोजी दुपारी अडीच वाजता रंगणार आहे. दरम्यान, साईच्या पश्चिम विभागीय केंद्राचे उपसंचालक वीरेंद्र भांडारकर यांनी महाराष्ट्र संघाची जर्सी सत्यम निकम याला आज एका सोहळ्यात प्रदान केली. यावेळी औरंगाबाद हॉकी संघटनेचे सचिव पंकज भारसाखळे यांची उपस्थिती होती.
राष्ट्रीय स्पर्धेसाठी जाहीर झालेला महाराष्ट्राचा संघ :
सत्यम निकम (कर्णधार), व्यंकटेश केचे (उपकर्णधार), आमिद खान पठाण, रविराज शिंगटे, किरण मोहिते, सूरज कांबळे, महेश पाटील, अथर्व कांबळे, सचिन कोल्हेकर, हर्ष परमार, हरीश शिंगडी, धैर्यशील जाधव, प्रज्वल मोहरकर, श्रीकांत बोडिगम, अमिल कोल्हेकर, मयूर धनवडे, कृष्णा मुसळे, यश अंगीर. प्रशिक्षक : अजित लाक्रा, एडविन मोती जॉन.
महाराष्ट्राचे साखळी सामने
१७ फेब्रुवारी : उत्तर प्रदेश हॉकी
१८ फेब्रुवारी : हॉकी गंगपूर-ओडिशा
२0 फेब्रुवारी : दिल्ली हॉकी
२१ फेब्रुवारी : हॉकी कर्नाटक

Web Title: Aurangabad's Satyam Bhushwaj is the captain of Maharashtra in the national hockey tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.