औरंगाबादच्या हर्षदाची आशियाई स्पर्धेसाठी निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 12:31 AM2019-03-23T00:31:46+5:302019-03-23T00:33:08+5:30

तैवान येथे २५ मार्च ते २ एप्रिलदरम्यान होणाऱ्या १२ व्या आशियाई एअर गन अजिंक्यपद स्पर्धेसाठी औरंगाबादची आंतरराष्ट्रीय नेमबाज हर्षदा निठवे हिची भारतीय संघात निवड झाली आहे. याच वर्षी ‘खेलो इंडिया’अंतर्गत नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक आणि त्यानंतर शासनाकडून प्रतिष्ठित अशा शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित झालेल्या हर्षदा निठवे ही आशियाई स्पर्धेत १० मीटर एअर पिस्टल प्रकारात भारतीय कनिष्ठ संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.

Aurangabad's Harshad Asian Games | औरंगाबादच्या हर्षदाची आशियाई स्पर्धेसाठी निवड

औरंगाबादच्या हर्षदाची आशियाई स्पर्धेसाठी निवड

googlenewsNext
ठळक मुद्देतैवान येथील स्पर्धेत करणार भारताचे प्रतिनिधित्व

औरंगाबाद : तैवान येथे २५ मार्च ते २ एप्रिलदरम्यान होणाऱ्या १२ व्या आशियाई एअर गन अजिंक्यपद स्पर्धेसाठी औरंगाबादची आंतरराष्ट्रीय नेमबाज हर्षदा निठवे हिची भारतीय संघात निवड झाली आहे. याच वर्षी ‘खेलो इंडिया’अंतर्गत नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक आणि त्यानंतर शासनाकडून प्रतिष्ठित अशा शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित झालेल्या हर्षदा निठवे ही आशियाई स्पर्धेत १० मीटर एअर पिस्टल प्रकारात भारतीय कनिष्ठ संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
याआधी २०१५ मध्ये नवी दिल्ली येथील आशियाई एअर गन स्पर्धेत सहभाग नोंदवताना हर्षदाने वैयक्तिक कास्य आणि सांघिक सुवर्णपदक जिंकले होते. त्याचप्रमाणे याच वर्षी कुवैत येथील आशियाई स्पर्धेतही हर्षदाने सांघिक गोल्डन कामगिरी केली होती. हर्षदाने २०१६ मध्ये अजरबैजन येथील ज्युनिअर वर्ल्डकपमध्ये सांघिक सुवर्ण आणि वैयक्तिक चौथा क्रमांक मिळवला होता. २०१६ मध्ये हर्षदाने पुणे येथील राष्ट्रीय स्पर्धेत ७ पदके जिंकण्याचा पराक्रम केला होता. हर्षदाने २०१७ मध्ये सिनिअर वर्ल्डकप स्पर्धेतही भारताचे प्रतिनिधित्व केलेले आहे. या वर्षी तिने खेलो इंडिया स्पर्धेत २१ वर्षांखालील वयोगटात १० मीटर एअर पिस्टलमध्ये महाराष्ट्राला सुवर्णपदक जिंकून दिले होते. आतापर्यंत विविध स्तरांवरील स्पर्धेत एकूण ८० पदकांची लूट करणाऱ्या हर्षदाला प्रशिक्षक प्रा. संग्राम देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले आहे. हर्षदा एमजीएमच्या नेमबाजी केंद्रात सराव करते. या निवडीबद्दल एमजीएमचे सचिव अंकुशराव कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रवीण सूर्यवंशी, जिल्हा नेमबाजी संघटनेचे अध्यक्ष व पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, सचिव प्रकाश फाटक, मनीष धूत, राजू बागडे, उमेश पटवर्धन, हेमंत मोरे, आदींनी तिचे अभिनंदन करीत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

Web Title: Aurangabad's Harshad Asian Games

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.