औरंगाबादच्या सीए विद्यार्थी संघटनेचा दिल्लीत गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 03:00 AM2018-02-19T03:00:05+5:302018-02-19T03:00:05+5:30

सीए विद्यार्थी संघटनेच्या देशात १८० शाखा कार्यरत असून औरंगाबादेतील सीए विद्यार्थी संघटनेच्या कार्याचा दिल्लीत गौरव करण्यात आला.

Aurangabad's CA student organization's pride in Delhi | औरंगाबादच्या सीए विद्यार्थी संघटनेचा दिल्लीत गौरव

औरंगाबादच्या सीए विद्यार्थी संघटनेचा दिल्लीत गौरव

googlenewsNext

औरंगाबाद : सीए विद्यार्थी संघटनेच्या देशात १८० शाखा कार्यरत असून औरंगाबादेतील सीए विद्यार्थी संघटनेच्या कार्याचा दिल्लीत गौरव करण्यात आला. केंद्रीय राज्यमंत्री पी. पी. चौधरी व आयसीएआय संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सीए नीलेश विकमसे यांनी येथील शाखेला द्वितीय पुरस्कार प्रदान केला.
पश्चिम विभागातील तीन राज्यांतून सर्वोत्कृष्ट शाखेचा बहुमान या एकाच सीए विद्यार्थी संघटनेला मिळाला. केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री सुरेश प्रभू, केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल प्रमुख पाहुणे होते. भिलाईची सीए विद्यार्थी संघटना पहिल्या क्रमाकांची मानकरी ठरली. त्यांनी ६ हजार आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये सीएच्या अभ्यासक्रमाबद्दल जागृती निर्माण केली. औरंगाबादेतील सीए संघटनेने वर्षभरात जीएसटी, रेरा, ई-वे बिल आदींसंदर्भात जनजागृती कार्यक्रम घेतले. गुरुपौर्णिमा उत्सव व शहीद जवानांच्या परिवाराला सन्मानित केले व आर्थिक मदत दिली. सीए विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सीए रोहन आचलिया, उपाध्यक्ष ऐश्वर्या ब्रह्मेचा व सचिव रोहन खंडेलवाल यांनी पुरस्कार स्वीकारला.
औरंगाबाद सीए संघटनेचे अध्यक्ष सीए अल्केश रावका व पदाधिकाºयांनी मार्गदर्शन केले. शहरातील सर्व सीए विद्यार्थी व सीए यांचा यांचे हे यश आहे, असे प्रतिपादन सीए रोहन आचलिया यांनी केले. संघटनेचे अभिनव शर्मा, मंजिरी महतोले, श्रेया लड्डा, रोहन मुगदिया, राशी तोतला यांनी वर्षभर उपक्रमांसाठी परिश्रम घेतले.

Web Title: Aurangabad's CA student organization's pride in Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.