महामॅरेथॉनच्या फिटनेस पार्टीत औरंगाबादकरांचा दणक्यात ‘रॉकआॅन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 12:44 AM2017-11-20T00:44:57+5:302017-11-20T00:45:02+5:30

किटी पार्टी, बर्थडे पार्टी आपण अनेकदा ऐकल्या आहेत. मात्र, अवघ्या महाराष्ट्रात पहिल्यांदाच झालेल्या ‘फिटनेस पार्टी’ला औरंगाबादकरांनी दणक्यात प्रतिसाद दिला आणि ‘वुई आर रेडी.....’ असे म्हणत १७ डिसेंबर रोजी शहरात होणाºया सॅफ्रॉन लॅण्डमार्क प्रस्तुत औरंगाबाद महामॅरेथॉनसाठी आपण जबरदस्त तयारीत असल्याचे दाखवून दिले.

 Aurangabadkar's 'RockAan' team at Mahamarethan's fitness party | महामॅरेथॉनच्या फिटनेस पार्टीत औरंगाबादकरांचा दणक्यात ‘रॉकआॅन’

महामॅरेथॉनच्या फिटनेस पार्टीत औरंगाबादकरांचा दणक्यात ‘रॉकआॅन’

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : किटी पार्टी, बर्थडे पार्टी आपण अनेकदा ऐकल्या आहेत. मात्र, अवघ्या महाराष्ट्रात पहिल्यांदाच झालेल्या ‘फिटनेस पार्टी’ला औरंगाबादकरांनी दणक्यात प्रतिसाद दिला आणि ‘वुई आर रेडी.....’ असे म्हणत १७ डिसेंबर रोजी शहरात होणाºया सॅफ्रॉन लॅण्डमार्क प्रस्तुत औरंगाबाद महामॅरेथॉनसाठी आपण जबरदस्त तयारीत असल्याचे दाखवून दिले.
महामॅरेथॉनसाठी नावनोंदणी केलेल्या सर्व धावपटूंसाठी रविवारी सायंकाळी लोकमत लॉन येथे या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. महामॅरेथॉनचा महासोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असल्यामुळे आता धावपटूंनी फिटनेसबाबत अधिकाधिक जागरूक होणे आवश्यक झाले आहे. यासाठी सर्व धावपटूंनी एकत्र येऊन फिटनेससाठी ‘वार्म अप’ करावे आणि हेल्दी ड्रिंक आणि फूडचा आनंद घ्यावा, यासाठी रंगलेली ही पार्टी धावपटूंसाठी पर्वणीच ठरली.
आकर्षक प्रकाशयोजना, थिरकण्यास भाग पाडेल असे ‘रॉकआॅन म्युझिक’ आणि हॉलिवूड तसेच बॉलिवूडच्या तालावर थिरकत आबालवृद्धांनी केलेला उत्स्फूर्त जल्लोष, असे उत्साहवर्धक वातावरण या पार्टीदरम्यान दिसून आले. सॅफ्रॉन लॅण्डमार्कचे अनिल मुनोत, ललित झांबड यांनी याठिकाणी येऊन उपस्थितांचा उत्साह वाढविला.
महामॅरेथॉनसाठी शहरवासीयांमध्ये उसळलेल्या प्रचंड उत्साहाची प्रचीती या फिटनेस पार्टीत आली. व्यायामाचे जुने प्रकार मागे सोडून उपस्थितांनी रिलॅक्स झीलच्या एक्सपर्ट ट्रेनरनी शिकविलेले नवीन व्यायाम प्रकार आत्मसात केले आणि संगीताच्या तालावर स्वत:ला झोकून देत एकच जल्लोष केला. झुंबा, भांगडा, पिलोझिंग, मसाला बॉलिवूड यासारखे नवनवीन व्यायाम प्रकार आत्मसात करून उपस्थितांनी फिटनेस पार्टीचा ‘झिंगाट’ आनंद लुटला. आपल्या मित्रमंडळींसोबत आणि कुटुंबासोबत एकत्रितपणे व्यायाम करणे सर्वांसाठीच वेगळा अनुभव देणारे ठरले. यादरम्यान ज्येष्ठ नागरिकांनीही तरुणांच्या तालात ताल मिसळून झुंबाच्या तालावर ठेका धरून बहारदार नृत्य केले. व्यायाम करून नवचैतन्य मिळविल्यानंतर ‘हेल्दी’ पदार्थांचा आस्वाद घेऊन पार्टीचा समारोप झाला.

Web Title:  Aurangabadkar's 'RockAan' team at Mahamarethan's fitness party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.