औरंगाबादमध्ये चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला जाळून मारण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2017 06:38 PM2017-12-25T18:38:19+5:302017-12-25T18:38:36+5:30

चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीला मारहाण पतीनेच तिला  पेटवून दिले. या घटनेत पती-पत्नी गंभीररित्या जळाले असून त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना २३ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास सिडकोतील आयोध्यानगर येथे घडली. 

In Aurangabad, trying to burn his wife on the basis of character allegation | औरंगाबादमध्ये चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला जाळून मारण्याचा प्रयत्न

औरंगाबादमध्ये चारित्र्याच्या संशयावरून पत्नीला जाळून मारण्याचा प्रयत्न

googlenewsNext

औरंगाबाद : चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीला मारहाण करून पतीनेच पेटवून दिल्याची घटना समोर आली आहे. यात पती -पत्नी दोघेही  गंभीररित्या जळाले असून त्यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना २३ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास सिडकोतील आयोध्यानगर येथे घडली. 

अनिल वाघ(रा. आयोध्यानगर, सिडको एन-७) त्याची  पत्नी रेणुका  (२८)असे भाजलेल्या पती-पत्नीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की,अनिल हा एका औषध विक्रेत्याकडे डिलेव्हरी बॉय म्हणून काम करायचा.   काहीपासून पती-पत्नीत किरकोळ कारणावरुन सतत वाद होतात. या वादातून रेणुका हिने दिलेल्या तक्रारीवरुन यापूर्वी अनिलविरोधात गुन्हा  नोंदविण्यात आला होता. यानंतर कोर्टासमोर त्यांच्यात तडजोड झाली आणि ते पुन्हा एकत्र संसार करु लागले.आरोपी अनिल हा रेणुकाच्या चारित्र्यावर संशय घेत. यातून त्यांच्यात भांडण होत.

२३ रोजी सायंकाळी अनिलने पुन्हा तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन भांडण सुरू केले. एवढेच नव्हे तर त्याने तिच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले. यावेळी तिला पेटविताना अनिलच्या कपड्यानेही पेट घेतला. आणि दोघेही पती-पत्नी गंभीररित्या जळाले. या घटनेची माहिती मिळताच सिडको पोलिसांनी तिचा जबाब नोंदविला. तिने दिलेल्या जबाबाच्या आधारे अनिलविरोधात गुन्हा नोंदविला.पोलीस उपनिरीक्षक सागर कोते हे तपास करीत आहे.

Web Title: In Aurangabad, trying to burn his wife on the basis of character allegation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.