औरंगाबाद : शिवजयंतीदिनी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 12:05 AM2018-02-18T00:05:42+5:302018-02-18T00:05:46+5:30

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त औरंगाबाद जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यात शिवजयंती दिनी सकाळी ९ ते ९.३० वाजेदरम्यान शहरातील शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या पुतळ्यांवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी कळविले.

Aurangabad: Shivjhanti Dini helicopter florist | औरंगाबाद : शिवजयंतीदिनी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

औरंगाबाद : शिवजयंतीदिनी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त औरंगाबाद जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यात शिवजयंती दिनी सकाळी ९ ते ९.३० वाजेदरम्यान शहरातील शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या पुतळ्यांवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी कळविले.
शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला क्रांतीचौक येथे सायंकाळी ६ वाजता दिवे लावून, मशाली हातात घेऊन दीपोत्सव साजरा केला जाणार आहे. सकाळी ९.३० वाजता ध्वजारोहणाने उत्सवाची सुरुवात होणार आहे. क्रांतीचौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येईल.
याचवेळी टीव्ही सेंटर येथील छत्रपती संभाजी महाराज, जयभवानीनगर चौक, पुंडलिकनगर, आविष्कार चौक, एन-७ सिडको आणि मुकुंदवाडी येथील शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावरही पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. ठरल्याप्रमाणे मनपाने सकाळी साडेनऊ वाजता पुतळ्याची उंची वाढविण्याकरिता भूमिपूजन केले, तर भूमिपूजनाचा कार्यक्रम होईल, नाही तर सायंकाळी ५ वाजता समितीतर्फे उद्घाटन करण्यात येईल. शिवजयंतीचा उत्सव प्रत्येक शिवप्रेमींनी विविध भागात साजरा करावा आणि मुख्य मिरवणुकीत सहभागी व्हावे, असे आवाहन विनोद पाटील यांनी केले.
संस्थान गणपती येथून निघणार मुख्य मिरवणूक
शहराचे ग्रामदैवत श्री संस्थान गणपती येथून मुख्य मिरवणुकीची सुरुवात सायंकाळी साडेचार वाजता होईल. यात घोडे, मावळे, तुळशीवृंदावन डोक्यावर घेऊन महिला, ढोल, लेझीम, झांज पथके, विविध सजीव, निर्जीव देखावे असतील.
सायंकाळी ८ वाजता क्रांतीचौक येथे आतषबाजीचे आयोजन केले आहे.

Web Title: Aurangabad: Shivjhanti Dini helicopter florist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.