Aurangabad saw the flood of waste! | औरंगाबादमध्ये दिसली जागा की पूर कचरा!
औरंगाबादमध्ये दिसली जागा की पूर कचरा!

औरंगाबाद : नगरविकास विभागाच्या मुख्य सचिव मनीषा म्हैसकर यांनी मागील आठवड्यात महापालिकेला कचरा प्रश्नातून मार्ग काढण्यासाठी पंचसूत्रीचा अवलंब करण्याची सूचना केली होती. मात्र सोमवारपासून प्रशासनाने दिसेल त्या मोकळ््या जागेत खड्डा करून ओला व सुका कचरा पुरण्यास सुरुवात केली
आहे. मनीषा म्हैसकर यांनी शहरातील ११५ वॉर्डांमध्ये कचºयाचे वर्गीकरण करावे, ओला कचरा वॉर्डांमध्येच खड्डे करून खत तयार करावे, असा सल्ला दिला होता. मात्र उलट सोमवारपासून कमल तलाव, शाळांची मैदाने
आदी ठिकाणी कचरा टाकला.
>मॉर्निंग वॉक बंद : महापालिका कचरा उचलत नसल्याने ठिकठिकाणी कचºयाला आग लावण्याच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. मॉर्निंग वॉकला शुद्ध हवेसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना धुराचा त्रास सहन करावा लागत आहे.


Web Title: Aurangabad saw the flood of waste!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.