औरंगाबादच्या अडत बाजाराला नवीन तुरीचे लागले वेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2018 12:17 PM2018-10-16T12:17:25+5:302018-10-16T12:18:48+5:30

बाजारगप्पा : मुगाची आवक घटली असून, आता अडत बाजाराला नवीन तुरीचे वेध लागले आहेत

Aurangabad market hoping for a new tur dal | औरंगाबादच्या अडत बाजाराला नवीन तुरीचे लागले वेध

औरंगाबादच्या अडत बाजाराला नवीन तुरीचे लागले वेध

googlenewsNext

- प्रशांत तेलवाडकर (औरंगाबाद)

मागील आठवड्यात ज्वारीच्या भावात क्विंटलमागे ५० ते १०० रुपयांपर्यंत वाढ झाली. अन्य धान्याचे भाव स्थिर होते. मुगाची आवक घटली असून, आता अडत बाजाराला नवीन तुरीचे वेध लागले आहेत. यंदा पावसाने दगा दिल्याने त्याचा मोठा फटका खरीप पिकांना बसला आहे. याचा परिणाम बाजार समितीच्या उत्पन्नावरही झाला आहे. ज्वारीची पेरणी रबी हंगामात केली जाते. विशेषत: मराठवाडा व विदर्भात ज्वारीची पेरणी मोठ्या प्रमाणात होते; पण याच भागात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली.

विहिरीची पाणी पातळी घटली आहे. या पार्श्वभूमीवर पुढील महिन्यांपासून ज्वारीच्या पेरणीला सुरुवात होत आहे. परिणामी, बाजारात क्विं टलमागे ५० ते १०० रुपयांपर्यंत ज्वारीचे भाव वधारले. जाधववाडीतील कृषी उत्पन्न बाजार समितीत जुनी ज्वारी १६०० ते २१०० रुपये प्रतिक्विं टल विक्री होत आहे. मात्र, मोंढ्यात २२५० ते २६०० रुपयांपर्यंत ज्वारी विक्री सुरू आहे. ज्वारीच्या भावात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. 

राजस्थान, गुजरात आदी राज्यांतून मागील आठवड्यात १२५ टन तर स्थानिक भागातून २० ते २५ टन बाजरी विक्रीसाठी बाजारात आली. अजून आॅक्टोबर हीट सुरू आहे. थंडी पडली नसल्याने बाजरीला मागणी कमीच आहे. परिणामी, १८०० ते २००० रुपये प्रतिक्विंटलवर भाव स्थिर होते. स्थानिक शेतकऱ्यांनी शनिवारी अडत बाजारात बाजरी विक्रीसाठी आणली होती. १२५० ते १८७१ रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. मागील आठवड्यात मध्यप्रदेशसह गुजरात व राजस्थान येथून ३५० टन गव्हाची आवक झाली. सध्या सणासुदीचे दिवस असल्याने गव्हाला मागणी आहे; पण मागील आठवड्यात भाव स्थिर होते. २३५० ते २६५० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत गहू विक्री झाला. 

आता नवीन तुरीचे वेध लागले आहेत. येत्या महिनाभरात नवीन तूर अडत बाजारात दाखल होईल. यंदा पाऊस कमी पडल्याने त्याचा तुरीच्या उत्पादनावर परिणाम झाला होऊन ३० ते ४० टक्क्यांपर्यंत उत्पादन घटल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे. सध्या बाजारात जुनी तूर दाळ ५१०० ते ५५०० रुपये प्रतिक्विंटलदरम्यान विक्री होत आहे. नवीन तुरीची आवक सुरू झाली तरीही उत्पादनाला बसलेला फटका लक्षात घेता, भाव कमी होणार नाही, अशी माहिती व्यापारी नीलेश सोमाणी यांनी दिली.

महिन्याच्या पहिल्या आठवड्यात नवीन दिल्लीतून नवीन बनावट बासमतीची आवक सुरू झाली होती. ३२०० ते ८ हजार प्रतिक्विंटलपर्यंत डुप्लिकेट बासमतीची विक्री झाली. मात्र, मागील आठवड्यात नवीन तांदळाची आवक कमी प्रमाणात राहिली. नवीन तांदळाच्या अन्य व्हरायटीची आवक दिवाळीनंतर सुरू होईल. उत्पादनाचा अंदाज आल्यानंतरच पुढील तेजी मंदी ठरेल. दरम्यान, शासनाने हमी भाव जाहीर केला. हमी भावाप्रमाणेच व्यापाऱ्यांनी शेतमालाची खरेदी करावी, असे आदेश शासनाने दिले असले तरीही तसे कोणीही करीत नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांच्या आहेत.

Web Title: Aurangabad market hoping for a new tur dal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.