औरंगाबाद महामॅरेथॉनची ‘महा’झिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 01:41 AM2017-12-18T01:41:53+5:302017-12-18T01:42:31+5:30

गारखेडा परिसरातील विभागीय क्रीडा संकुलामध्ये रविवारी (दि.१७) पहाटे पाच वाजेपासून खेळाडूंनी गर्दी केली होती. मॅरेथॉनमध्ये ठरवलेले अंतर पूर्ण करून आपली शारीरिक क्षमता सिद्ध करणे आणि ठरवलेले ध्येय साध्य करण्याच्या ऊर्मीने पेटलेल्या मॅरेथॉनप्रेमींच्या उत्साहामुळे सगळे वातावरणच विद्युतभारित झाले होते.

 Aurangabad Mahamarethon's 'MahaSingh' | औरंगाबाद महामॅरेथॉनची ‘महा’झिंग

औरंगाबाद महामॅरेथॉनची ‘महा’झिंग

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : गारखेडा परिसरातील विभागीय क्रीडा संकुलामध्ये रविवारी (दि.१७) पहाटे पाच वाजेपासून खेळाडूंनी गर्दी केली होती. मॅरेथॉनमध्ये ठरवलेले अंतर पूर्ण करून आपली शारीरिक क्षमता सिद्ध करणे आणि ठरवलेले ध्येय साध्य करण्याच्या ऊर्मीने पेटलेल्या मॅरेथॉनप्रेमींच्या उत्साहामुळे सगळे वातावरणच विद्युतभारित झाले होते.
‘माझ्या शहरासाठी अन् माझ्या उत्तम आरोग्यासाठी मी धावणार’ या एकाच उद्देशाने धावपटू मैदानावर उपस्थित होते. कोणी ३ कि. मी., कोणी ५ कि. मी. तर कोणी १० किंवा २१ कि. मी. धावण्यासाठी आले होते. यामध्ये महिला, बच्चे कंपनी आणि तरुणांचा प्रचंड सहभाग दिसून आला. मॅरेथॉनपूर्वी रिलॅक्स झील गु्रपतर्फे खेळाडूंना ‘वार्म अप’ म्हणून झुंबा डान्सचे आयोजन करण्यात आले होते. लोकप्रिय इंग्रजी, हिंदी व मराठी गाण्यांच्या तालावर औरंगाबादकरांनी ठेका धरला. त्यामुळे सकाळची झोप आणि आळस कुठे निघून गेला हे कळलेच नाही.धावपटूंना ‘चिअर अप’ करण्यासाठी रस्त्यावर उभारण्यात आलेल्या स्टेजवर देशभक्तीपर गीते म्हणण्यात येत होती. नियोजित टार्गेट पूर्ण केल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहºयावर दिसत होता. मॅरेथॉन पूर्ण करून सर्व खेळाडू संकुलाच्या मैदानावर जमले असता सूर्य थोडा वर आला होता. गुलाबी थंडी आणि कोवळ्या उन्हाचा आनंद घेत धावपटंूनी विश्रांती घेतली. पावन गणेश मंडळाचे ढोलपथक आणि ‘मोक्ष’ बँडने आपल्या धमाकेदार सादरीकरणातून आलेल्या मॅरेथॉनपटूंचे स्वागत केले.
टीव्ही मालिका अभिनेता देवदत्त नागे आणि अभिनेत्री संस्कृती बालगुडे यांची बक्षीस वितरण सोहळ्यातील उपस्थिती खेळाडूंचा उत्साह वाढविणारी ठरली. खेळाडूंची जिद्द आणि मेहनतीचे त्यांनी कौतुक केले. २१ आणि १० कि. मी. गटातील विविध विजेत्यांना विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, ‘लोकमत’चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा, खा. चंद्रकांत खैरे, महापौर नंदकुमार घोडेले, आ. अतुल सावे, आ. सतीश चव्हाण, आ. संजय शिरसाट, पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे आदी मान्यवरांच्या हस्ते यावेळी बक्षीस देण्यात आले.
दुर्धर आजाराला मागे टाकत पराग धावला
पराग श्रीनिवास लिगदे... वय अवघे १३ वर्षे... परंतु दुर्धर आजाराने ग्रस्त... तब्बल दोन वर्षे बेडवर झोपून असलेल्या चिमुकल्यावर काही महिन्यांपूर्वीच शस्त्रक्रिया झाली. शस्त्रक्रियेनंतर तो चालायला लागला; परंतु त्याला धावताना पाहून आई-वडिलांना अनेक महिने झाली होती; परंतु ‘लोकमत’ने आयोजित केलेल्या महामॅरेथॉन स्पर्धेत पराग धावला आणि हा क्षण त्याच्यासाठी, त्याच्या आई-वडिलांसाठी पराकोटीचा आनंद देणारा ठरला.
बीड बायपास परिसरातील हरिरामनगर येथील रहिवासी श्रीनिवास लिगदे आणि वैशाली लिगदे यांचा पराग हा एकुलता एक मुलगा. पराग बे्रन ट्यूमर हायपोथॅलमिक ग्लायोमा एन. एफ. ०१, कर्करोगाने ग्रस्त असून, जानेवारी २०११ पासून उपचार सुरू आहेत. त्याने आतापर्यंत ७० केमोथेरपी घेतल्या आहेत, तर ब्रेन आणि स्पाईनचे १३ एमआरआय काढले आहेत. या आजाराने दोन वर्षे तो बेडवर होता. चालणे सोडा, उठणेही अशक्य होते. ७ ते ८ महिने तो बोलतही नव्हता. आपल्या चिमुकल्याला या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी त्याच्या आई-वडिलांनी मोठे कष्ट घेतले. काही महिन्यांपूर्वी परागच्या ब्रेनचे आॅपरेशन झाले. या शस्त्रक्रि येनंतर परागच्या प्रकृतीत सुधारणा झाली. व्हिलचेअरच्या मदतीने श्रीनिवास लिगदे हे परागला फिरवीत होते.
तो स्वत:च्या पायावर उभा राहू लागला. ‘लोकमत’ने शहरात महामॅरेथॉन स्पर्धा आयोजित केल्याचे परागने वाचले. त्याच क्षणी त्याने स्पर्धेत सहभागी होण्याचा निश्चय केला. ही एक परीक्षा असून ती पास झालो की, जिंकलो, या भावनेने त्याचे आई-वडीलही त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. ५ कि.मी. अंतराच्या महामॅरेथॉनमध्ये पराग सहभागी झाला. तब्बल दोन वर्षांनंतर परागला धावताना पाहताना खूप आनंद झाल्याची भावना श्रीनिवास लिगदे यांनी व्यक्त केली.
धावण्याची प्रेरणा
आज मी जो उभा आहे, ते केवळ माझ्या आई-वडिलांमुळे. महामॅरेथॉन स्पर्धेच्या आयोजनाविषयी ‘लोकमत’मध्ये वाचले, तेव्हा त्यात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. स्पर्धेत धावून खूप आनंद मिळाला. हा क्षण मोठा आनंद देणारा होता. पुढच्या वर्षीही महामॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होण्याचे निश्चत केल्याचे पराग लिगदे म्हणाला.
तुतारीचा निनाद
स्पर्धा सुरू होताच एकीकडे आकाशात आतषबाजी तर दुसरीकडे सचिन गुरव ग्रुप तुतारी वाजवून शाही थाटात स्पर्धकांचे स्वागत करीत होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूस दोन तुताºया वाजविल्या जात होत्या. या तुतारीचा ध्वनी दूरपर्यंत ऐकू येत होता. त्यांच्यासोबत मराठमोळ्या वेशभूषेतील तरुणी पारंपरिक पद्धतीने स्वागत करताना दिसून आल्या. या स्वागतामुळे प्रत्येक स्पर्धक भारावून जात होते.
देशभक्तिपर गीतांमुळे जोश
क्रीडा संकुल ते शहानूरमियाँ दर्गा रस्त्याच्या कडेला एक छोटेसे स्टेज उभारण्यात आले होते. येथे ‘औरंगाबाद कराओके क्लब’चे गायक सदस्य विविध देशभक्तिपर गीत सादर करून स्पर्धकांमध्ये स्फूर्ती निर्माण करीत होते. अनेक जण देशभक्तिपर गीतांवर नृत्य करताना दिसून आले. गटागटाने युवक-युवती नृत्य करीत आनंद साजरा करीत होते. काही युवतींनी तर माईक हातात घेऊन गायकांच्या स्वरात स्वर मिळविला. रतन नागरे, अनिरुद्ध वरणगावकर, वैभव पारकर व अजय बेलसरे यांनी देशभक्तीपर गीत गाऊन सर्वांचा उत्साह वाढविला.
भारावलेले ते पाच तास
जोश, जल्लोष, उदंड उत्साह काय असतो हे लोकमत महामॅरेथॉनच्या निमित्ताने सर्वांनी अनुभवले. रविवारी पहाटे सूर्योदयाच्या आधीच शहरात चैतन्यदायी वातावरण निर्माण झाले होते. प्रत्येक स्पर्धकांमध्ये एक वेगळी ऊर्जा दिसून आली.
४ वाजेपासून हजारो स्पर्धक विभागीय क्रीडा संकुलाच्या दिशेने निघाले होते एका अविस्मरणीय स्पर्धेचा साक्षीदार होण्यासाठी. मॅरेथॉन झाल्यानंतर सकाळी १० वाजेपर्यंत जल्लोष कायम होता. उदंड उत्साहाने मंतरलेले पाच तास, आमच्या आयुष्यात सुवर्णाक्षराने कोरल्या गेले. अशाच उत्स्फूर्त प्रतिक्रिया यावेळी धावपटूंनी व्यक्त केल्या.
औरंगाबादकरांच्या
संयमाला सलाम
लोकमत महामॅरेथॉन स्पर्धेच्या निमित्ताने शहरातील मुख्य रस्त्यांना येऊन जोडणाºया छोट्या-छोट्या रस्त्यांवरून सकाळी ५.३० वाजता वाहतुकीला सुरुवात झाली. प्रत्येक चौकात वाहतूक पोलिसांनी अत्यंत चोखपणे काम केले. स्पर्धेच्या निमित्ताने काही तासांसाठी वाहतूक वळविण्यात आल्याचे वाहतूक पोलीस, स्वयंसेवक सांगत होते. कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या नागरिकांनीही लोकमत महामॅरेथॉन स्पर्धेचे स्वागत करून आपली वाहने वळवून घेतली. आमखास मैदान, किलेअर्क, लेबर कॉलनी आदी भागांत हे चित्र पाहायला मिळाले. आमखास मैदानाजवळील कॅन्सर हॉस्पिटल चौकात स्पर्धकांचे स्वागत ढोल-ताशांच्या गजरात करण्यात येत होते. मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांनीही स्पर्धेचे कौतुक केले. रस्त्याच्या कडेला उभे राहून बच्चे कंपनी स्पर्धकांचा उत्साह द्विगुणित करीत होते.
महापालिकेचे सहकार्य
लोकमत महामॅरेथॉन स्पर्धेसाठी एक महिना आधीच महापौर नंदकुमार घोडेले यांनी बैठक घेऊन प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. शहरात दाखल होणाºया आंतरराष्टÑीय, राष्टÑीय स्पर्धकांना कोणताच त्रास होणार नाही, याची संपूर्ण काळजी घेण्याची सूचनाही त्यांनी केली. अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग व त्यांच्या सर्व सहकाºयांनी २१ किलोमीटर रस्त्यांवरील खड्डे बुजविणे, साफसफाई, विद्युत व्यवस्था आणि पाणीपुरवठा विभागानेही चोखपणे सर्व व्यवस्था केली.
महामॅरेथॉन स्पॉन्सर्स
यावेळी सॅफ्रॉन गु्रपचे अनिल मुनोत, मनोज काला, ललित झांबड, राजेश वरगंटवार, महेश लाभशेटवार, डॉ. योगेश वरगंटवार, प्राईड ग्रुपचे नितीन व नवीन बगडिया, धूत ट्रान्समिशनचे राहुल धूत, सोमशेखर पाटील, गणेश बजाज, नितीन शहा, आनंद बियाणी, पंकज बाहेती, फर्स्ट आयडिया एज्युकेशनचे सचिन मलिक, कूल्झी अ‍ॅक्वा मिनरल वॉटरचे श्रीकांत पाटील, धूत हॉस्पिटलचे डॉ. विजय बोरगावकर, डॉ. हिमांशू गुप्ता, पगारिया आॅटोचे राहुल पगारिया, संदीप युनिव्हर्सिटीचे संदीप पवार, स्वप्नजित कदम व ललित पाटील, फ्रुटेक्सचे शैलेश गुप्ता आदी मान्यवर उपस्थित होते.
यांचे सहकार्य लाभले
सॅफ्रॉन लॅण्डमार्क, धूत ट्रान्समिशन, रिसो राईस ब्रान आॅईल, सारा ग्रुप, वोखार्ट, फर्स्ट आयडिया एज्युकेशन, प्राईड ग्रुप, व्हेरॉक, बँक आॅफ बडोदा, बँक आॅफ इंडिया, संदीप युनिव्हर्सिटी, फ्रुटेक्स, एनर्जील, स्टे स्पोर्टी, वेदिका केअर एनक्यूअर, अभिषेक अ‍ॅडस्, रेडिओ मिर्ची, सेठ नंदलाल धूत हॉस्पिटल, युनायटेड सिग्मा हॉस्पिटल, यू टू कॅन रन, रिलॅक्स झील ग्रुप, कूल्झी अ‍ॅक्वा वॉटर, पगारिया आॅटो, प्रोझोन, सीआरटी, एस. एस. प्रो, क्रिम एन क्रंच, अल्टिमेट फिटनेस.
यांचे विशेष आभार
औरंगाबाद महानगरपालिका, औरंगाबाद पोलीस, स्पोर्टस् पार्टनर महाराष्ट्रीय हौशी अ‍ॅथलेटिक्स संघटना, औरंगाबाद

Web Title:  Aurangabad Mahamarethon's 'MahaSingh'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.