औरंगाबाद लोकसभा निवडणूक निकाल 2019 : खैरे आणि जलील यांच्यात T20 ची लढत; शेवटच्या फेऱ्यांमध्ये बदलतेय आघाडीचे चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 06:35 PM2019-05-23T18:35:02+5:302019-05-23T18:39:45+5:30

सुरुवातीपासून  आघाडीवर असलेले जलील शेवटच्या काही फेऱ्यात पिछाडीवर आले, मात्र त्यांनी पुन्हा आघाडी घेतल्याचे चित्र

Aurangabad Lok Sabha Elections 2019: T20 between Khair and Jhelil; Changing the front-row picture | औरंगाबाद लोकसभा निवडणूक निकाल 2019 : खैरे आणि जलील यांच्यात T20 ची लढत; शेवटच्या फेऱ्यांमध्ये बदलतेय आघाडीचे चित्र

औरंगाबाद लोकसभा निवडणूक निकाल 2019 : खैरे आणि जलील यांच्यात T20 ची लढत; शेवटच्या फेऱ्यांमध्ये बदलतेय आघाडीचे चित्र

googlenewsNext

औरंगाबाद : मराठवाड्यासह राज्यात लक्षवेधी ठरलेल्या या मतदारसंघातील चौरंगी लढतीत विजय कुणाचा होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रत्येक फेरीनुसार शिवसेनेचे चंद्रकांत खैरे आणि वंचित बहुजन आघाडीचे इम्तियाज जलील यांच्यातील आघाडी कमी जास्त होत आहे. सुरुवातीपासून  आघाडीवर असलेले जलील शेवटच्या काही फेऱ्यात पिछाडीवर असल्याचे चित्र आहे. 

मराठवाड्याची राजधानी असलेल्या या शहरावर मागील चारही लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने बाजी मारली आहे. यावेळच्या निवडणुकीत मात्र शिवसेनेला प्रचंड प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली आहे. शिवसेना आणि भाजपची युती झाल्यानंतरही या मतदारसंघात दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये मतदानानंतर झालेल्या आरोप- प्रत्यारोपामुळेही ही निवडणूक गाजली.  वंचित आघाडीने या मतदारसंघात एमआयएमचा उमेदवार देऊन प्रयोग केला आहे. तो अत्यंत यशस्वी होताना दिसत असून २० फेऱ्यापर्यंत ते आघाडीवर होते. मात्र, २१ व्या फेरीमध्ये सेनेच्या खैरेंनी ७०० मतांची महत्वपूर्ण आघाडी घेतली. यानंतर दोघांमध्येही आघाडीवरून चुरस वाढत जात आहे. शेवटच्या माहितीनुसार जलील यांनी परत ९ हजारांची आघाडी घेतली आहे. 

मतदारसंघः औरंगाबाद
फेरीः २१ वी फेरी

आघाडीवरील उमेदवाराचे नावः इम्तियाज जलील 
पक्षः एमआयएम- वंचित बहुजन आघाडी 
मतंः 370327

पिछाडीवरील उमेदवाराचे नावः चंद्रकांत खैरे 
पक्षः शिवसेना 
मतंः 361060

पिछाडीवरील उमेदवाराचे नावः हर्षवर्धन जाधव 
पक्षः शिव स्वराज्य बहुजन पक्ष 
मतंः 267370

पिछाडीवरील उमेदवाराचे नावः सुभाष झांबड 
पक्षः कॉंग्रेस 
मतंः 86137

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात एकूण १८,८६,२९४ मतदार असून यंदाच्या निवडणुकीत ६३.२ टक्के मतदान झालंय.    

गेल्या निवडणुकीत शिवसेनेने चौथ्यांदा चंद्रकांत खैरे यांनाच पसंती दिली. काँग्रेसने माजी आमदार नितीन पाटील यांना मैदानात उतरविले होत. खैरे यांनी पाटील यांचा १ लाख ६२ हजार मतांनी पराभव करत लोकसभेत प्रवेश केला होता. 
 

Web Title: Aurangabad Lok Sabha Elections 2019: T20 between Khair and Jhelil; Changing the front-row picture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.