औरंगाबाद - हैदराबाद पॅसेंजर लवकरच होणार एक्स्प्रेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2018 06:13 PM2018-02-09T18:13:49+5:302018-02-09T18:22:39+5:30

औरंगाबाद- हैदराबाद पॅसेंजर लवकरकच एक्स्प्रेस होण्याची चिन्हे आहेत. या संदर्भात दक्षिण मध्य रेल्वेच्या वरिष्ठ कार्यालयाने नांदेड विभागाचे मत मागविले आहे.

Aurangabad - Hyderabad passenger will soon be express | औरंगाबाद - हैदराबाद पॅसेंजर लवकरच होणार एक्स्प्रेस

औरंगाबाद - हैदराबाद पॅसेंजर लवकरच होणार एक्स्प्रेस

googlenewsNext

औरंगाबाद : दररोज दुपारी ३.३० वाजता जाणारी औरंगाबाद- हैदराबाद पॅसेंजर लवकरच एक्स्प्रेस होण्याची चिन्हे आहेत. या संदर्भात दक्षिण मध्य रेल्वेच्या वरिष्ठ कार्यालयाने नांदेड विभागाचे मत मागविले आहे.

'दमरे' ने पाच पॅसेंजर रेल्वेला गाड्यांना एक्स्प्रेस करण्याची तयारी केली आहे. यात औरंगाबाद - हैदराबाद पॅसेंजरचा समावेश आहे. ही रेल्वे औरंगाबाद रेल्वेस्टेशनवरून दररोज दुपारी ३.३० वाजता हैदराबादसाठी रवाना होते. हैदराबादकडे जाण्यासाठी दुपारच्या वेळेतील ही रेल्वे सोईची ठरते. ही रेल्वे आता एक्स्प्रेस करण्याच्या हालचाली सुरु आहेत. यामुळे प्रवाशांची सुविधा होईल. या सोबतच या मार्गावरील ज्या स्टेशनवर तिकीट विक्री कमी आहे किंवा विक्री होतच नाही याचीही माहिती गोळा केली जात आहे. त्यामुळे सध्या थांबणा-या काही स्टेशनवर ही रेल्वे एक्स्प्रेस झाल्यानंतर थांबणार नसल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दक्षिणी प्रवाशांची सोय
ही रेल्वे एक्स्प्रेस झाल्यानंतर दक्षिण भागातील प्रवाशांची यामुळे सुविधा होईल. त्यांची सुविधा होण्यासाठीच या पॅसेंजरला एक्स्प्रेस करण्याचा खटाटोप केला जात आहे, असा आरोप प्रवासी संघटनाकडून होत आहे.

Web Title: Aurangabad - Hyderabad passenger will soon be express

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.