औरंगाबाद जिल्ह्यात काँग्रेसकडून विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांची नावे जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 06:07 PM2019-07-08T18:07:50+5:302019-07-08T18:10:36+5:30

विधानसभा निवडणुकीसाठी चाचपणी

In Aurangabad district, Congress nominates the names of the candidates for the Vidhan Sabha elections | औरंगाबाद जिल्ह्यात काँग्रेसकडून विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांची नावे जाहीर

औरंगाबाद जिल्ह्यात काँग्रेसकडून विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांची नावे जाहीर

googlenewsNext
ठळक मुद्दे‘वंचित’ बरोबर आघाडी करण्याची तयारीसोशल इंजिनिअरिंगवर राहणार भर

औरंगाबाद : जिल्ह्यातील नऊही मतदारसंघांसाठी काँग्रेसने इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविले होते. असे अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी दुपारी पत्रपरिषद घेऊन जिल्हा काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष अनिल पटेल व शहर काँग्रेसचे अध्यक्ष नामदेव पवार यांनी ही नावे जाहीर केली. ती अशी :

सिल्लोड मतदारसंघ- प्रभाकर पालोदकर, श्रीराम महाजन, सुनील काकडे, विजय दौड, कैसर आझाद, राजेश मानकर, भास्कर घायवट. 
कन्नड- संतोष कोल्हे, नामदेव पवार, नितीन पाटील, अशोक मगर, अनिल सोनवणे, बाबासाहेब मोहिते.
फुुलंब्री- डॉ. कल्याण काळे, अनिल मानकापे, तारा उकिर्डे.
पैठण- अनिल पटेल, विनोद तांबे, बाळासाहेब भोसले, शेख तय्यब शेख बाबा.
गंगापूर- किरण पाटील डोणगावकर, सय्यद कलीम.
वैजापूर- पंकज ठोंबरे, प्रशांत सदाफळ.

यानंतर नामदेव पवार यांनी औरंगाबाद शहराच्या तीन मतदारसंघांतील इच्छुकांची नावे जाहीर केली. ती अशी :
औरंगाबाद पूर्व- इब्राहिम पटेल, इब्राहिम पठाण, जीएसए अन्सारी, मोहसीन अहमद, अशोक जगताप, सरताज पठाण, अहमद हुसेन.
औरंगाबाद पश्चिम- डॉ. जितेंद्र देहाडे, चंद्रभान पारखे, महेंद्र रमंडवाल, पंकजा माने, जयप्रकाश नारनवरे, राघोजी जाधव, जयदीप झाल्टे, सतीश शिरसाट, रमेश शिंदे, प्रदीप शिंदे, साहेबराव बनकर.
औरंगाबाद मध्य- मोहंमद हिशाम उस्मानी, सागर मुगदिया, मशरूर खान, मो. अय्युब खान, युसूफ खान.
या तिन्ही मतदारसंघांत आणखी काही अर्ज येणार असल्याची शक्यता पवार यांनी वर्तवली. 

यावेळी अनिल पटेल यांनी सिल्लोड तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी श्रीराम महाजन यांची नियुक्ती जाहीर केली. लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांवर कारवाई होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून समीर सत्तार यांच्याजागी आता जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून पंकज ठोंबरे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचेही पटेल यांनी सांगितले. अनिल पटेल यांनी सांगितले, २००९ च्या निवडणुकीतील जिल्ह्यातला ३/६ असा फार्म्युला राहील. पण पैठण यावेळी काँग्रेससाठी सुटायला पाहिजे, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. सिल्लोड तालुका काँग्रेस कार्यकारिणी बदलण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेस विलास औताडे, मुजफ्फर खान, डॉ. पवन डोंगरे, मीर हिदायत अली, अरुण शिरसाट, मीर हिदायत अली, संतोष भिंगारे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. 

सोशल इंजिनिअरिंग करू.... 
विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी काँग्रेसचा भर सोशल इंजिनिअरिंगवर राहील. आमच्या मतदारसंघवार बैठका झाल्या आहेत. पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या बाबतीत चार दिवसांनंतर व्यापक बैठक आयोजित करून डॉक्टर, वकील व बुद्धिवंतांची मते जाणून घेतली जाणार आहेत. काँग्रेसची मानसिकता वंचित बहुजन आघाडीबरोबर आघाडी करण्याची आहे. वंचित बहुजन आघाडीच्याही कार्यकर्त्यांची दिसते, पण याबाबतीत श्रेष्ठीच निर्णय घेतील, असे नामदेव पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. वंचित बहुजन आघाडीबरोबरची आघाडी एमआयएम सोडून झाली पाहिजे, असे मत पवार यांनी मांडले. 

पक्ष जी निवडणूक लढवायला सांगेल, ती लढवणार 
औरंगाबाद -जालना स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या आमदारकीची माझी मुदत संपत आहे. त्यानंतर विधानसभेच्याही निवडणुका होत आहेत. लोकसभा निवडणुकीत पराभूत झालो असलो तरी मी मैदान सोडलेले नाही. पक्षाच्या आदेशाचे पालन करणारा मी कार्यकर्ता आहे. पक्षाने स्थानिक स्वराज्य मतदारसंघाची निवडणूक लढायला सांगितल्यास ती मी लढेन. पक्षाला असे वाटले की, मी विधानसभेची निवडणूक लढवावी, त्यालाही मी तयार आहे, अशी भूमिका आजच्या पत्रकार परिषदेत आमदार सुभाष झांबड यांनी व्यक्त केली.

Web Title: In Aurangabad district, Congress nominates the names of the candidates for the Vidhan Sabha elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.