नाशिककडून औरंगाबाद ५५ धावांनी पराभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 12:53 AM2018-05-13T00:53:23+5:302018-05-13T00:54:57+5:30

फलंदाजांच्या सुमार कामगिरीमुळे औरंगाबादला शनिवारी पुणे येथे एमसीएतर्फे सुरू असलेल्या सुपरलीग क्रिकेट स्पर्धेत नाशिककडून ५५ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. ८८ धावांत एकूण १२ बळी घेणारा सत्यजित बच्छाव हा नाशिकच्या विजयाचा शिल्पकार ठरला.

Aurangabad defeated Nashik by 55 runs | नाशिककडून औरंगाबाद ५५ धावांनी पराभूत

नाशिककडून औरंगाबाद ५५ धावांनी पराभूत

googlenewsNext

औरंगाबाद : फलंदाजांच्या सुमार कामगिरीमुळे औरंगाबादला शनिवारी पुणे येथे एमसीएतर्फे सुरू असलेल्या सुपरलीग क्रिकेट स्पर्धेत नाशिककडून ५५ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. ८८ धावांत एकूण १२ बळी घेणारा सत्यजित बच्छाव हा नाशिकच्या विजयाचा शिल्पकार ठरला.
औरंगाबादने प्रथम फलंदाजी करणाऱ्या नाशिकचा पहिला डाव १५३ धावांत रोखला. नाशिककडून जयेश अहिरेने ४२ व श्रीकांत शेरीकरने ३६ धावा केल्या औरंगाबादकडून प्रवीण क्षीरसागर व शुभम चाटे यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले. तथापि, गोलंदाजांच्या कामगिरीवर फलंदाजांनी पाणी फेरल्याने औरंगाबादचा पहिला डाव ७४ धावांत संपुष्टात आला. औरंगाबादकडून मधुर पटेलने ३१ व स्वप्नील चव्हाणने २१ धावा केल्या. नाशिककडून सत्यजित बच्छाव व गौरव काळे यांनी प्रत्येकी ४ गडी बाद केले. पहिल्या डावात ७९ धावांची आघाडी घेणाºया नाशिकने त्यांचा दुसरा डाव ८ बाद १८५ धावांवर घोषित करून औरंगाबादसमोर २६५ धावांचे विजयासाठी लक्ष्य ठेवले. नाशिककडून दुसºया डावात जयेश अहिरेने ८९ व प्रतीक आठवले याने ५३ धावा केल्या. औरंगाबादकडून संदीप सहानीने ३ व राहुल शर्माने २ गडी बाद केले. २६५ धावांचे विजयाचे लक्ष्य घेऊन खेळणाºया औरंगाबादचा दुसरा डाव २0९ धावांत आटोपला. औरंगाबादकडून मधुर पटेलने ५९, नितीन फुलाने याने ५४, सूरज सुलाने याने २९ व प्रज्ज्वल घोडकेने २८ धावा केल्या नाशिककडून सत्यजित बच्छावने ६५ धावांत ८ गडी बाद केले. त्याला गौरव काळेने २ गडी बाद करीत साथ दिली.

Web Title: Aurangabad defeated Nashik by 55 runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.