कच-याच्या धुराने अस्थमाच्या रुग्णांमध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2019 10:16 PM2019-02-03T22:16:13+5:302019-02-03T22:16:31+5:30

औरंगाबाद : शहरात वर्षभरापासून निर्माण झालेल्या कचराकोंडीमुळे सर्रास कचरा जाळण्याचा प्रकार होत आहे. त्यामुळे अस्थमाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याची माहिती ...

Asthma sufferers have increased asthmatics | कच-याच्या धुराने अस्थमाच्या रुग्णांमध्ये वाढ

कच-याच्या धुराने अस्थमाच्या रुग्णांमध्ये वाढ

googlenewsNext

औरंगाबाद : शहरात वर्षभरापासून निर्माण झालेल्या कचराकोंडीमुळे सर्रास कचरा जाळण्याचा प्रकार होत आहे. त्यामुळे अस्थमाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याची माहिती श्वसन व छातीविकार तज्ज्ञ डॉ. बालाजी बिरादार यांनी रविवारी दिली.
शहरातील विविध भागांत गेली काही महिने दिवस-रात्र क चरा जाळण्यावर भर देण्यात आला. त्यामुळे शहरातील प्रदूषणात भर पडली. त्याबरोबर अस्थमाच्या रुग्णांनाही त्याचा त्रास सहन करावा लागला. धुरामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ झाली.

विशेषत: लहान मुलांना धुराचा सर्वाधिक त्रास होत आहे. वाहनांतील धूर हा वेगळा असतो. त्याचप्रमाणे लाकूड जाळणे आणि कचरा जाळणे यातून निर्माण होणारा धूरही हा भिन्न असतो. कचºयात प्लास्टिकचा समावेश असतो. त्यामुळे त्यातून निर्माण होणार धूर अधिक घातक ठरू शकतो. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना नाकाला रुमाल बांधला पाहिजे. अस्थमाच्या रुग्णांना व्यायाम करताना पुरेशी काळजी घेतली पाहिजे, असे डॉ. बिरादार म्हणाले.

Web Title: Asthma sufferers have increased asthmatics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.