राज्यस्तरीय बँड स्पर्धेत आर्यचाणक्य धाम संघ अजिंक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2017 12:03 AM2017-11-19T00:03:04+5:302017-11-19T00:04:26+5:30

क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणेअंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व उपसंचालक क्रीडा व युवक औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय राज्यस्तरीय बँड स्पर्धेत औरंगाबादच्या आर्य चाणक्य विद्याधाम संघाने विजेतेपद पटकावले. विभागीय क्रीडा संकुलावर शनिवारी झालेल्या या स्पर्धेत भंडारा येथील सन फ्लॅग संघ अजिंक्य ठरला.

Aryachanakya Dham Sangh Ajinkya in the state-level band competition | राज्यस्तरीय बँड स्पर्धेत आर्यचाणक्य धाम संघ अजिंक्य

राज्यस्तरीय बँड स्पर्धेत आर्यचाणक्य धाम संघ अजिंक्य

googlenewsNext

औरंगाबाद : क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणेअंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व उपसंचालक क्रीडा व युवक औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय राज्यस्तरीय बँड स्पर्धेत औरंगाबादच्या आर्य चाणक्य विद्याधाम संघाने विजेतेपद पटकावले. विभागीय क्रीडा संकुलावर शनिवारी झालेल्या या स्पर्धेत भंडारा येथील सन फ्लॅग संघ अजिंक्य ठरला.
या स्पर्धेत मुलांच्या गटात चंद्रपूर, सोलापूर, अहमदनगर, औरंगाबाद, बुलडाणा, जळगाव, धुळे, अकोला या संघांनी सहभाग घेतला. मुलींच्या गटात अहमदनगर, सोलापूर, धुळे, बुलडाणा, भंडारा, चंद्रपूर, सातारा व यजमान औरंगाबादच्या संघाने सहभाग नोंदवला. या स्पर्धेचे उपसंचालक क्रीडा उपसंचालक राजकुमार माहादावाड व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. दयानंद कांबळे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी ऊर्मिला मोराळे यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. बक्षीस वितरण क्रीडा भारतीचे भिकन बारसे, उदय कहाळेकर, क्रीडा उपसंचालक राजकुमार माहादावाड, ऊर्मिला मोराळे, प्रशांत नवगिरे यांच्या उपस्थितीत झाले.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्रीडा अधिकारी गोकुळ तांदळे, गुरुदीपसिंग संधू, कृष्णा केंद्रे, भाऊराव वीर, चंद्रशेखर घुगे, सदानंद सवळे, सचिन बोर्डे, गणेश बेटुदे आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Aryachanakya Dham Sangh Ajinkya in the state-level band competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.