The army telephone guard of the camp area threw away with thieves | छावणी एरियातील लष्कराची टेलिफोन वायर चोरट्यांनी पळविली
छावणी एरियातील लष्कराची टेलिफोन वायर चोरट्यांनी पळविली

औरंगाबाद : छावणीच्या लष्करी कार्यालयातील टेलिफोनची वायर चोरट्यांनी तोडून नेली. ही घटना १२ मार्च रोजी दुपारी उघडकीस आली. याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला.


पोलिसांनी सांगितले की, लष्करातील सिग्नल कंपनीतील हवालदार महेर सिंह यांनी याविषयी तक्रार नोंदविली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार त्यांच्या कार्यालयातील एमईएस बंगलो येथील आर्मी टेलिफोन बंद पडल्याचे त्यांना सांगण्यात आले. यानंतर त्यांनी आणि अन्य जवानांनी एमईएस बंगलो परिसरातील टेलिफोन केबलची तपासणी केली. छावणीतील लोखंडी पुलाजवळील सुमारे १४ हजार रुपये किमतीची जेएफसी २० पीईआर ९ एमएमच्या टेलिफोनची वायर चोरट्यांनी तोडून नेली. यावरून हवालदार सिंह यांनी छावणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली.


Web Title:  The army telephone guard of the camp area threw away with thieves
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.