आरटीई प्रवेशासाठी मोबाईल अ‍ॅपद्वारे अर्ज भरता येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 06:52 PM2019-01-23T18:52:24+5:302019-01-23T18:52:48+5:30

शिक्षण हक्क कायद्यानुसार शाळांमध्ये गोरगरीब विद्यार्थ्यांना २०१९-२० या शैक्षणिक वर्षात २५ टक्के कोट्यातून प्रवेश देण्याची प्रक्रिया फेब्रुवारी महिन्यात सुरू होणार आहे.

Application can be filled through mobile app for RTE admission | आरटीई प्रवेशासाठी मोबाईल अ‍ॅपद्वारे अर्ज भरता येणार

आरटीई प्रवेशासाठी मोबाईल अ‍ॅपद्वारे अर्ज भरता येणार

googlenewsNext

औरंगाबाद : शिक्षण हक्क कायद्यानुसार शाळांमध्ये गोरगरीब विद्यार्थ्यांना २०१९-२० या शैक्षणिक वर्षात २५ टक्के कोट्यातून प्रवेश देण्याची प्रक्रिया फेब्रुवारी महिन्यात सुरू होणार आहे. यंदा मोबाईल अ‍ॅपद्वारे अर्ज करता येणार आहेत. यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे काढून घेण्याचे आवाहन जि.प. प्राथमिक शिक्षणाधिकारी सूरजप्रसाद जैस्वाल यांनी केले.


शहरातील नामांकित शाळांमध्ये शिक्षण हक्क कायद्यानुसार २५ टक्के जागा १ लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे बंधनकारक आहे. यासाठी जि.प.च्या शिक्षण विभागामार्फत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. मागील वर्षी ही प्रक्रिया नियोजित वेळी पूर्ण झाली नसल्याने अर्ध्या जागा रिक्त राहिल्या होत्या. यावर्षीही हीच परिस्थिती उद्भवू नये, यासाठी फेब्रुवारीपासूनच प्रवेश प्रक्रिया राबविण्याच्या सूचना १९ जानेवारी रोजी शिक्षण संचालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यानुसार शिक्षणाधिकाºयांनी पत्र काढून आरटीईअंतर्गत प्रवेश घेण्यासाठी आवश्यक असलेले रहिवासी पत्त्याचा पुरावा, जन्म प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असणाºया खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी उत्पन्नाचे प्रमाणपत्र, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी दिव्यांग प्रमाणपत्र आदी कागदपत्रे संबंधित शासकीय कार्यालयातून काढून घेण्याचे आवाहन केले आहे.

येत्या शैक्षणिक वर्षातील प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांचे वय ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत नर्सरीसाठी ३ वर्षे पूर्ण आणि १ लीसाठी सहा वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक लवकच शासनाच्या संकेतस्थळावर टाकण्यात येणार आहे. यावर्षी पालकांसाठी मोबाईल अ‍ॅपद्वारे नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही जैस्वाल यांनी कळविले.
मनपास्तरावर आरटीई कक्ष स्थापन होणार
महापालिकेच्या शाळांमध्ये आरटीईअंतर्गत प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी आरटीई कक्ष स्थापन करावा, यासाठी जि.प.च्या शिक्षणाधिकाºयांनी महापालिकेच्या शिक्षणाधिकाºयांना पत्र पाठविले आहे. या पत्रात शहरातील शाळांची नोंदणी करताना शाळेचा पत्ता, रिक्त पद, शाळेचे शुल्क व याबाबतचे अभिलेखे सरल प्रणालीवर अपडेट करावेत, असेही या पत्रात म्हटले आहे.

मागील वर्षी २६६१ जागा रिक्तच राहिल्या
शिक्षण हक्क कायद्यानुसार मागील वर्षी औरंगाबाद जिल्ह्यात ५६५ शाळांमध्ये ६ हजार ३७५ जागा उपलब्ध होत्या. या शाळांमधील प्रवेशासाठी ११ हजार ७६४ एवढे मोठ्या प्रमाणात अर्जही आले होते. मात्र, चार फेºयानंतर प्रत्यक्षात केवळ ३ हजार ७१४ विद्यार्थ्यांचेच प्रवेश झाले. तब्बल २ हजार ६६१ जागा रिक्त राहिल्या होत्या. नियोजित वेळेत ही प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली नसल्यामुळे पालकांना नाईलाजास्तव इतर शाळांमध्ये प्रवेश घ्यावे लागले होते. यावर्षीही मागील वर्षीप्रमाणे प्रवेश फेºयांसाठी दिरंगाई करण्यात येऊ नये, अशी प्रतिक्रिया आरटीई पालक संघाचे अध्यक्ष प्रशांत साठे यांनी दिली.

 

Web Title: Application can be filled through mobile app for RTE admission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.