औरंगाबाद वगळता इतर ठिकाणी होम सेंटर कायम?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 12:49 AM2017-11-20T00:49:18+5:302017-11-20T00:49:22+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाने अभियांत्रिकीसाठी होम सेंटर रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाची औरंगाबाद जिल्ह्यात अंमलबजावणी होणार आहे.

 Apart from Aurangabad, where else will Home Center be maintained? | औरंगाबाद वगळता इतर ठिकाणी होम सेंटर कायम?

औरंगाबाद वगळता इतर ठिकाणी होम सेंटर कायम?

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाने अभियांत्रिकीसाठी होम सेंटर रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाची औरंगाबाद जिल्ह्यात अंमलबजावणी होणार आहे. मात्र, जालना, बीड, परळी, उस्मानाबाद आणि तुळजापूर येथे अभियांत्रिकीचे एकच महाविद्यालय असल्यामुळे होम सेंटर रद्द करण्यात अडचणी निर्माण होत असल्याचे परीक्षा संचालक डॉ. दिगंबर नेटके यांनी सांगितले.
विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयातील अभ्यासक्रमांच्या परीक्षा त्याच महाविद्यालयात (होम सेंटर) घेण्यात येत होत्या. मात्र, होम सेंटरवर होणारे गैरप्रकार वाढल्यामुळे होम सेंटर रद्द करण्याची मागणी मागील दोन सत्रांपासून होत
आहे.
मागील सत्रात साई इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी महाविद्यालयाने गाठलेल्या गैरप्रकाराच्या कळसाचा भंडाफोड पोलिसांनी केला. यामुळे विद्यापीठाच्या परीक्षा मंडळात कुलगुरूंनी होम सेंटर कायमस्वरूपी रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा केली. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी केवळ औरंगाबाद जिल्ह्यातच करणे शक्य असल्याचे डॉ. नेटके यांनी सांगितले.
औरंगाबाद शहरात अभियांत्रिकी महाविद्यालयांची संख्या अधिक असल्यामुळे एका महाविद्यालयातील विद्यार्थी दुसºया ठिकाणी जाऊ शकतात. मात्र, जालना, बीड, परळी, उस्मानाबाद आणि तुळजापूरमध्ये केवळ एकच महाविद्यालय आहे. अभियांत्रिकी वगळता इतर महाविद्यालयांनी अभियांत्रिकीचे परीक्षा केंद्र घेण्यास नकार दिला
आहे. यामुळे त्या पाच शहरांतील होम सेंटर कायम ठेवण्याशिवाय दुसरा पर्यायच शिल्लक नसल्याचे डॉ. नेटके म्हणाले. हे होम सेंटर कायम राहिल्यास विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाने घेतलेल्या निर्णयाचे उल्लंघन होणार आहे.

Web Title:  Apart from Aurangabad, where else will Home Center be maintained?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.