लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वसतिगृहात पुन्हा एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी घडली. गणेश शंकरराव कोपूरवाड (२३, रा. बिलोली, ह. मु. माजलगाव) असे या विद्यार्थ्याचे नाव असून, तो विद्यापीठातील संगणकशास्त्र विभागात एम.एस्सी.च्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होता. त्याच्याजवळ सापडलेल्या सुसाइड नोटनुसार, मुलीच्या एकतर्फी प्रेमातून होणाºया छळास कंटाळून त्याने आत्महत्येचे पाऊल उचलले असावे, असे सकृतदर्शनी वाटत असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. प्रेमप्रकरणातून विद्यार्थ्याने आत्महत्या करण्याची विद्यापीठातील ही मागच्या पंधरा दिवसांमधील दुसरी घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विद्यापीठातील वसतिगृह क्रमांक १ मध्ये गणेश त्याचा लहान भाऊ उमेश व इतर दोन मित्रांसह खोली क्रमांक ९८ मध्ये राहत होते. विद्यापीठात एम.एस्सी प्रथम वर्षात प्रवेश मिळाल्यानंतर तो तीन दिवसांपूर्वीच शनिवारी येथे राहायला आला होता.
सुसाइड नोट ‘जशीच्या तशी....’
संगीता या मुलीने माझा तीन वर्षे मला छळत राहिली. तिला बोलत जाऊ नको म्हणालो तरी बोलत राहिली. मी बोलणं सोडून दिलं. तिला रिप्लाय पण देणं सोडून दिलं; पण तिने कोमल या तिच्या मैत्रिणीच्या एफबी अकाऊंटवरून मला बोलत राहिली. मला हे २ महिने समजलं नाही. मी कोमल समजून बोलायचो. नंतरही बोलणं बंद केलं तरी बोललो.
मागच्या एक वर्षापासून तिने मला खूप त्रास दिला. तिने रेवती या तिच्या मैत्रिणीच्या बॉयफ्रेंडला सांगितलं. त्याने मला माजलगावमध्ये राहू देणार नाही आणि त्याच्यासोबतच्या दिनेश या मुलाने मला जिवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे मला घरातून बाहेर पण पडायला भीती वाटत होती. मी नांदेडचा आहे असं म्हणून त्यांनी मला खूप त्रास दिला. काल पहिला दिवस होता माझा डिपार्टमेंटला, तर तिने मला मारण्यासाठी डिपार्टमेंटचे चार मुलं पाठविले होते. ते कन्टिन्यू माझ्या मागेपुढे फिरायचे. रेवती या मुलीने, काल त्या मुलांनी आणि संगीता हिला घेऊन मला टॉर्चर केले आहे. (या चिठ्ठीतील नावे बदलून काल्पनिक टाकली आहेत.)