अबब ! औरंगाबादकर दररोज रिचवतात २० लाख कप चहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 12:53 PM2018-07-14T12:53:24+5:302018-07-14T13:01:52+5:30

सध्या शहरात पावसाचा जोर नसला तरी ढगाळ वातावरण आणि दिवसभर राहणाऱ्या ढगाळ वातावरणामुळे चहाची विक्री २५ टक्क्यांनी वाढली आहे.

Amazing ! Aurangabadkar daily drinks 2 million cups of tea | अबब ! औरंगाबादकर दररोज रिचवतात २० लाख कप चहा

अबब ! औरंगाबादकर दररोज रिचवतात २० लाख कप चहा

googlenewsNext
ठळक मुद्देआपली तलफ भागविण्यासाठी शहरवासीय दररोज २० लाख कप चहा रिचवत आहेत.  दररोज साधारणपणे अडीच टन चहापत्ती यासाठी वापरली जात असावी, असा अंदाज आहे.

 औरंगाबाद : ‘आओ हमारे होटल में, चाय पियोजी गरम गरम... बिस्कुट खालो नरम नरम... जो दिल चाहे  माँगलो हमसे, सबकुछ है भगवान कसम...’ या १९५५ साली प्रदर्शित झालेल्या ‘कुंदन’ या चित्रपटातील गीताची पावसाळ्याच्या दिवसांत आठवण न होणारा ज्येष्ठ विरळाच. सध्या शहरात पावसाचा जोर नसला तरी ढगाळ वातावरण आणि दिवसभर राहणाऱ्या ढगाळ वातावरणामुळे चहाची विक्री २५ टक्क्यांनी वाढली आहे. आपली तलफ भागविण्यासाठी शहरवासीय दररोज २० लाख कप चहा रिचवत आहेत.  

२० लाख कप चहा बनविण्याचा खर्चही तसाच आहे. दररोज साधारणपणे अडीच टन चहापत्ती यासाठी वापरली जात असावी, असा अंदाज आहे. या चहापत्तीची किंमत सुमारे ७ लाख रुपयांपर्यंत जाते. चहा कमी अधिक गोड असला तरी तो बनविण्यासाठी साखर लागतेच. दररोज ४० लाख रुपयांची सुमारे १२०० क्विंटल साखर यासाठी खर्ची पडते. दुधाशिवाय चहा पिणारेही आता वाढले आहेत. तरीही शहरवासीयांना चहासाठी दररोज २ लाख लिटर दूध लागते. याचा खर्च सुमारे ८० लाख रुपये आहे. चहाची तलफ भागविण्यासाठी सर्व खर्च मिळून औरंगाबादकर तब्बल १ कोटी २७ लाख रुपयांचा खर्च करीत आहेत. पाणी मिसळून तीन ते साडेतीन लाख कप चहा व कॉपी बरे या चहाचा दरही कुठे ५ रुपये, कुठे ६ रुपये, कुठे ८ रुपये तर काही ठिकाणी १० रुपये कप (किंवा कट) असा अगदी स्वस्त असा आहे. काही कॅफेमध्ये मात्र ८० रुपयांपर्यंत चहा, कॉफी विकली जाते.  

आसामच्या चहापत्तीला अधिक पसंती 
आसाम व दक्षिण भारतातून चहापत्ती येते, पण आसाममधील चहापत्ती शहरात अधिक पसंत केली जाते. चहा विक्रेते रमेश रुणवाल यांनी सांगितले की, सध्या चहापत्तीची विक्री २५ टक्क्यांनी वाढली आहे. खप वाढला आहे. शहरात  ६० टक्के ब्रँडेड व ४० टक्के सुटी चहापत्ती विकली जाते. २८० ते ३०० रुपये किलोदरम्यानची चहापत्ती जास्त प्रमाणात विकते. साखरेचे व्यापारी नीलेश सेठी म्हणाले की, शहरात दररोज सुमारे १२०० क्विंटल साखर विकली जाते.

आठ लाख लोक चहा पितात
महानंदाचे व्यवस्थापक प्रदीप पाटील यांनी सांगितले की, शहरात सर्व कंपन्यांचा मिळून २ लाख लिटरपर्यंत दुधाची दररोज विक्री होते. ४० रुपये प्रतिलिटरने ८० लाख रुपयांचे दूध विकल्या जाते. चहा विक्रेते विजय कल्याणकर यांनी सांगितले की, दररोज शहरात २० लाख कपपेक्षा अधिक चहा तयार होतो. ८ ते १० लाख लोक ही चहा पितात. कोणी दोनदा तर कोणी तीनदा चहा पितात. दिवसभरात ५ ते ८ कप चहा पिणारेही काही महाभाग आहेत. 

Web Title: Amazing ! Aurangabadkar daily drinks 2 million cups of tea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.