तंत्रनिकेतन महाविद्यालयाचा संघ ठरला अजिंक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2017 11:58 PM2017-11-18T23:58:40+5:302017-11-19T00:00:22+5:30

एमजीएम संस्थेच्या ३५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित आॅलिम्पिक स्पर्धेत तंत्रनिकेतन महाविद्यालयाने विजेतेपद पटकावले. वैद्यकीय महाविद्यालयाचा संघ उपविजेतेपदाचा मानकरी ठरला. कनिष्ठ गटात क्लोव्हर डेल व नवी मुंबईतील मराठी प्राथमिक शाळा यांनी अनुक्रमे विजेतेपद व उपविजेतेपद मिळवले.

 Ajinkya becomes associate college | तंत्रनिकेतन महाविद्यालयाचा संघ ठरला अजिंक्य

तंत्रनिकेतन महाविद्यालयाचा संघ ठरला अजिंक्य

googlenewsNext
ठळक मुद्देएमजीएमच्या आॅलिम्पिक स्पर्धा : वैद्यकीय महाविद्यालयाला उपविजेतेपद

औरंगाबाद : एमजीएम संस्थेच्या ३५ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित आॅलिम्पिक स्पर्धेत तंत्रनिकेतन महाविद्यालयाने विजेतेपद पटकावले. वैद्यकीय महाविद्यालयाचा संघ उपविजेतेपदाचा मानकरी ठरला. कनिष्ठ गटात क्लोव्हर डेल व नवी मुंबईतील मराठी प्राथमिक शाळा यांनी अनुक्रमे विजेतेपद व उपविजेतेपद मिळवले.
विविध खेळांतील विजेते (८ वर्षांखालील मुले) : कबड्डी : संस्कार विद्यालय (मुले), -फुटबॉल : क्लोव्हर डेल स्कूल (मुले). थ्रोबॉल : संस्कार विद्यालय (मुले), क्लेव्हर डेल स्कूल (मुली). १२ वर्षांखालील (कबड्डी) : एमजीएम मराठी प्रायमरी स्कूल नवी मुंबई (मुले), एमजीएम मराठी प्रायमरी स्कूल नवी मुंबई (मुली). फुटबॉल : क्लोव्हर डेल स्कूल (मुले). थ्रोबॉल : क्लोव्हर डेल स्कूल (मुले), क्लोव्हर डेल स्कूल (मुली). ज्येष्ठ गट (फुटबॉल) एमजीएम पॉलिटेक्निक औरंगाबाद (मुले).
व्हॉलीबॉल : एमजीएम जवाहरलाल नेहरू इंजिनिअरिंग कॉलेज औरंगाबाद (मुले). थ्रोबॉल : एमजीएम डेंटल कॉलेज नवी मुंबई (मुली). कबड्डी : एमजीएम जवाहरलाल नेहरू इंजिनिअरिंग कॉलेज औरंगाबाद (मुले), एमजीएम लॉ कॉलेज नवी मुंबई (मुली). खो खो : एमजीएम इन्स्टिट्यूट आॅफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी औरंगाबाद (मुले), एमजीएम इन्स्टिट्यूट आॅफ नर्सिंग एज्युकेशन औरंगाबाद (मुली). बास्केटबॉल- एमजीएम जवाहरलाल नेहरू इंजिनिअरिंग कॉलेज औरंगाबाद (मुले), एमजीएम जवाहरलाल नेहरू इंजिनिअरिंग कॉलेज औरंगाबाद (मुली).
बक्षीस वितरण ब्रिगेडियर जगदीश चंद्रन, एमजीएम संस्थेचे सचिव अंकुशराव कदम, डॉ. प्रदीप कुमार, डॉ. आशिष गाडेकर, डॉ. हरिरंग शिंदे, बी.एन. शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी एमजीएम पत्रकारिता महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रेखा शेळके, डॉ. आशा देशपांडे, प्रा. विशाखा गारखेडकर, प्रा. कविता सोनी उपस्थित होते. नवी मुंबई, नोएडा, नांदेड, परभणी, औरंगाबाद येथील खेळाडू सहभागी झाले होते.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी डॉ. अभिजित ठाकूर प्रा. अनिल पालवे, प्रा. तनुजा दुबे, प्रा. अस्मिता जोशी, प्रा. चित्रा देशपांडे, डॉ. कुणाल गायकवाड, डॉ. जितेंद्रसिंह जमादार, प्रा. चंद्रशेखर ताठे, डॉ. पूजा देशमुख, डॉ. हर्षाली देशमुख, प्रा. प्रीती माने, प्रा. भक्ती बनवसकर, डॉ. रोहिणी चंडगे, प्रा. स्मिता खुरसाले आदींनी परिश्रम घेतले.

Web Title:  Ajinkya becomes associate college

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.