विमानतळ प्राधिकरणातर्फे कमकुवत दृष्टीच्या प्रवाशांसाठी सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 11:25 PM2019-02-19T23:25:08+5:302019-02-19T23:25:46+5:30

कमी दृष्टीच्या (अंधुक दिसणाऱ्या) प्रवाशांसाठी विमानतळ प्राधिकरणातर्फे विमानतळावर स्टेनलेस स्टीलच्या पट्ट्या आणि उंचवटे असलेल्या खिळ्यांच्या (स्टडस्) साहाय्याने विशिष्ट मार्ग तयार करण्यात आला आहे. त्यामुळे दृष्टी कमी असलेले प्रवासी त्यांच्या वाहनापासून विनासायास आणि सुरक्षितरीत्या विमानतळाच्या इमारतीमध्ये प्रवेश करून थेट विमानात प्रवेश करू शकतील.

Airport authorities offer a poor visibility for the passengers | विमानतळ प्राधिकरणातर्फे कमकुवत दृष्टीच्या प्रवाशांसाठी सुविधा

विमानतळ प्राधिकरणातर्फे कमकुवत दृष्टीच्या प्रवाशांसाठी सुविधा

googlenewsNext

औरंगाबाद : कमी दृष्टीच्या (अंधुक दिसणाऱ्या) प्रवाशांसाठी विमानतळ प्राधिकरणातर्फे विमानतळावर स्टेनलेस स्टीलच्या पट्ट्या आणि उंचवटे असलेल्या खिळ्यांच्या (स्टडस्) साहाय्याने विशिष्ट मार्ग तयार करण्यात आला आहे. त्यामुळे दृष्टी कमी असलेले प्रवासी त्यांच्या वाहनापासून विनासायास आणि सुरक्षितरीत्या विमानतळाच्या इमारतीमध्ये प्रवेश करून थेट विमानात प्रवेश करू शकतील.
विमानतळ संचालक शरद येवले म्हणाले की, कमकुवत दृष्टीच्या हवाई प्रवाशांसाठी स्टेनलेस स्टीलच्या पट्ट्या व उंचवटे असलेला मार्ग सुरक्षित आहे. हा मार्ग एक फूट रुंद आणि २०० फूट लांब आहे. कमी दिसणारे प्रवासी त्यांच्या वाहनातून उतरल्यानंतर त्यांच्या डाव्या बाजूला हा विशेष मार्ग तयार केलेला आहे. त्यामुळे कोणाच्याही मदतीशिवाय असे प्रवासी या पट्ट्यांच्या मार्गावरून सुरक्षितरीत्या विमानतळाच्या इमारतीमध्ये प्रवेश करू शकतील. पुढे या मार्गावर वळण घेऊन हे प्रवासी विमानतळाच्या काऊंटरवर पोहोचू शकतील. पट्ट्या आणि उंचवट्याच्या मार्गामुळे प्रवासी चालताना घसरणार नाहीत. या सुविधेसाठी प्राधिकरणाला काही लाख रुपये खर्चावे लागले; परंतु पैशांपेक्षा प्रवाशांना पुरविण्यात आलेली सुविधा महत्त्वाची आणि आवश्यक असल्याचे, ते म्हणाले.
अशा प्रकारच्या पट्ट्यांचे मार्ग मोठमोठे मॉल, रेल्वेस्थानक, मेट्रो स्टेशन, सबवे, रेस्टॉरंट, चित्रपटगृहे आणि शैक्षणिक संस्थांच्या परिसरात असतात. विमानतळावर ही सुविधा उपलब्ध झाल्यामुळे कमी दिसणाºया प्रवाशांना विमानतळात सुरक्षित आणि आत्मविश्वासाने प्रवेश करणे सुकर झाले आहे.
पूर्वी अशा प्रवाशांसाठी ‘कन्व्हेयर बेल्ट’लगत विशिष्ट राखीव जागा होती. नवीन विमानतळ फेब्रुवारी २००९ पासून कार्यरत झाले. चिकलठाणा विमानतळाचा विकास आणि विस्तारीकरणासाठी माजी मंत्री राजेंद्र दर्डा यांनी अजिंठा-वेरूळ विकास कार्यक्रमांतर्गत जपान बँक फॉर इंटरनॅशनल को-आॅपरेशन यांच्याकडून निधी उपलब्ध करून देण्यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडली होती.
अशा प्रवाशांसाठी सोयीच्या स्वच्छतागृहाची सुविधा पूर्वीपासूनच विमानतळावर आहे. युरोपियन पद्धतीची ही स्वच्छतागृहे कमकुवत दृष्टीच्या प्रवाशांना सोयीची आणि सुखकर असावीत, अशाच पद्धतीने तयार करण्यात आली आहेत, अशा विशेष प्रवाशांना विमानतळ विशेष साहाय्य करते.

Web Title: Airport authorities offer a poor visibility for the passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.