‘जायकवाडी’च्या प्रतिबंधित क्षेत्रात चर खोदणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 11:49 PM2019-03-15T23:49:07+5:302019-03-15T23:49:31+5:30

बळीराजा चिंतेत : उभी पिके वाचविण्यासाठीची धडपड व्यर्थ

 Action on farmers digging fields in the restricted area of 'Jaikwadi' | ‘जायकवाडी’च्या प्रतिबंधित क्षेत्रात चर खोदणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाई

‘जायकवाडी’च्या प्रतिबंधित क्षेत्रात चर खोदणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाई

googlenewsNext

पैठण : जायकवाडी धरणाच्या बॅक वॉटर क्षेत्रातील प्रतिबंधित क्षेत्रात पोकलेन लावून पाण्यासाठी चर खोदणाºया मुलानी वाडगाव येथील तीन शेतकऱ्यांना जायकवाडी प्रशासनाने केलेल्या तक्रारीनुसार बिडकीन पोलिसांनी समज देऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली.
जायकवाडी प्रशासनाच्या या कारवाईने शेतकरी अस्वस्थ झाले असून शेतात उभे असलेल्या पिकांना वाचवायचे कसे, असा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे.
जायकवाडीचा जलसाठा कमी होत असल्याने शेतीसाठी घेतलेल्या विद्युत मोटारीपासून पाणी बरेच दूर गेल्याने विद्युत पंप बंद पडले आहेत. शेतकºयांनी पिकांना पाणी द्यावे म्हणून जायकवाडीच्या जलफुगवटा क्षेत्रात चर खोदण्याचे काम सुरू केले होते. जायकवाडीचे बॅक वॉटर क्षेत्र पक्षी अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले आहे. या क्षेत्रात कुठलेही काम करण्यासाठी राज्य वन्यजीव मंडळाची परवानगी घेणे आवश्यक आहे, असे या शेतकºयांना जायकवाडी प्रशासनाने कळवून चर खोदण्याचे काम बंद केले आहे.
जायकवाडी धरणाची पाणीपातळी सध्या जोत्याखाली गेली आहे. यामुळे बॅक वॉटर क्षेत्रातील शेतकºयांनी लावलेल्या मोटारी कोरड्या पडल्या आहेत. शेतातील पिकांना पाणी देता यावे म्हणून शेतकºयांनी जायकवाडीच्या जलसाठ्यातून मोटारीपर्यंत पाणी यावे, म्हणून लोकवर्गणी करून मुलानी वाडगाव परिसरात यांत्रिक मशिनरी लावून चर खोदण्याचे काम सुरू केले होते. दरम्यान, याबाबत जायकवाडी प्रशासनास खबर मिळताच कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे, सहायक कार्यकारी अभियंता शिवप्रसाद खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक अभियंता बुद्धभूषण दाभाडे यांनी संबंधित शेतकºयांना चर खोदण्यास प्रतिबंध करण्यात यावा, असा अर्ज बिडकीन पोलिस ठाण्यात दिला होता. या अजार्नुसार सय्यद अफसर सय्यद अब्दुल, राजू हरिभाऊ मिसाळ व रामकिसन शिवाजी शेळके यांना पोलिसांनी समज देऊन जायकवाडीच्या बॅक वॉटर क्षेत्रामध्ये सुरू असलेले काम बंद केले आहे.
कोट....
शेतकरी म्हणतात... पाणी परवाना घेतला
आम्ही शासनाचा रितसर पाणी परवाना भरला आहे. धरणातील पाणी कमी झाल्याने आम्ही व इतर गावातील लोकांनी मिळून लोकवर्गणीतून जायकवाडी धरण जलफुगवटा क्षेत्रात पोकलेन लावून माती काढत होतो. असे केले नाही तर आमची पिके जळून जातील, मग आम्ही पाणी पाणी परवानगी घेऊन आमचा काय उपयोग आहे, अशी प्रतिक्रिया या शेतकºयांनी दिली.
जायकवाडी प्रशासनाची कारवाई
गोदावरीच्या उर्ध्व खोºयातून जायकवाडी धरणासाठी नऊ टीएमसी पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी केल्यानंतर सदरील प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले होते. यावेळी याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जायकवाडी धरणात पाण्याची गळती जास्त असून अवैध उपसा कनेक्शन जास्त असल्याचे म्हटले होते. जायकवाडी प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयात अवैध कनेक्शन रोखण्यासाठी तत्पर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. यानुसार जिल्हाधिकाºयांच्या मार्गदर्शनानुसार महावितरण, महसूल, पोलीस व जायकवाडी प्रशासन यांचे संयुक्त पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाने इसारवाडी परिसरात १२ फेब्रुवारी रोजी २४ अवैध विद्युत पंपाचे कनेक्शन तोडून जप्तीची कारवाई केली होती. दरम्यान, या कारवाईत अवैध कनेक्शनद्वारे इस्ट वेस्ट सीड्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी पाणी उचलत असल्याचे लक्षात आल्याने दगडी धरण अभियंता बुद्धभूषण दाभाडे यांनी या कंपनीस नोटीस देऊन दंडात्मक कारवाई केली. कंपनीने कारवाईनंतर पाणी उचलण्यासाठी रितसर अर्ज केला असल्याचे सहायक अभियंता बुद्धभूषण दाभाडे यांनी सांगितले.
जायकवाडीच्या बुडीत क्षेत्रात पथक तैनात
जायकवाडीच्या बुडीत क्षेत्रात येणाºया परिसरात गस्ती पथक तैनात करण्यात आले असून या पथकाद्वारे संपूर्ण क्षेत्रात नजर ठेवली जाणार असल्याचे दाभाडे यांनी सांगितले. जायकवाडी धरणाचा परिसरातील शेतकºयांनी पाणी परवाना घेतलेला असून पाणी उचलण्याचा त्यांना अधिकार आहे. राज्य वन्यजीव मंडळाकडे याबाबत शेतकºयांच्या वतीने अर्ज करून परवानगी मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे दत्ता गोर्डे, बप्पा शेळके, तुषार शिसोदे यांनी सांगितले.

Web Title:  Action on farmers digging fields in the restricted area of 'Jaikwadi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.