अबब...! औरंगाबाद शहरात दररोज चार टन प्लास्टिक विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 11:50 PM2018-03-17T23:50:19+5:302018-03-17T23:50:27+5:30

शहरात दररोज ४ टन प्लास्टिक विक्री होते. यात २ टन कॅरिबॅगचा समावेश होतोे. आजघडीला शहरातील ३५ होलसेलरकडे लाखो रुपयांच्या प्लास्टिक पिशव्या शिल्लक आहेत. या मालाचे नेमके करायचे काय, असा यक्ष प्रश्न व्यापाऱ्यांसमोर पडला आहे.

Above ...! Four tonnes of plastic sale every day in Aurangabad city | अबब...! औरंगाबाद शहरात दररोज चार टन प्लास्टिक विक्री

अबब...! औरंगाबाद शहरात दररोज चार टन प्लास्टिक विक्री

googlenewsNext
ठळक मुद्देपेच : होलसेल विक्रेत्यांकडे लाखो रुपयांच्या प्लास्टिक पिशव्या शिल्लक

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहरात दररोज ४ टन प्लास्टिक विक्री होते. यात २ टन कॅरिबॅगचा समावेश होतोे. आजघडीला शहरातील ३५ होलसेलरकडे लाखो रुपयांच्या प्लास्टिक पिशव्या शिल्लक आहेत. या मालाचे नेमके करायचे काय, असा यक्ष प्रश्न व्यापाऱ्यांसमोर पडला आहे.
विधानसभेमध्ये शुक्रवारी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी येत्या गुढीपाडव्यापासून राज्यात टप्प्याटप्प्याने प्लास्टिक बंदीची घोषणा केली आहे. पर्यावरण संरक्षणांतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे. औरंगाबादेत मुंबई, गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक विक्रीला येते.
शहरात प्रमुख ३५ होलसेल विक्रेते व २०० फेरीवाल्यांकडून वेगवेगळ्या प्रकारच्या ४ टन प्लास्टिकची दररोज विक्री होते. यात पॅकिंग बॅग, किराणा बॅग, कॅरिबॅग, दूध पॅकिंग, शॉपिंग बॅग, असे प्रकार आहेत. त्यातही २० प्रकारच्या कॅरिबॅग व पॅकेजिंगमध्ये २४० प्रकार उपलब्ध आहेत. ४ टनपैकी २ टन कॅरिबॅग विकल्या जातात. यावरून प्लास्टिक व्यवसायाची व्याप्ती लक्षात येते. आजघडीला शहरातील सर्व होलसेलर मिळून लाखो रुपयांच्या प्लास्टिक पिशव्या शिल्लक आहेत. गुढीपाडव्यापासून नवीन कायद्याप्रमाणे प्लास्टिक विक्री करणाºयांवर कारवाई करण्यात येणार आहे. टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी होत असली तरी, त्यात शहरात कधीपासून प्लास्टिक बंदी होते हे स्पष्ट झाले नाही.
प्लास्टिक दाण्यावर प्रथम बंदी आणा
प्लास्टिक ज्यापासून तयार होते, त्या प्लास्टिक दाणे उत्पादनावर राज्य सरकारने बंदी आणावी. संपूर्ण प्लास्टिक बंदी करण्याआधी सरकारने त्यावर पर्याय शोधून काढावा, तसेच विक्रेत्यांना त्यांच्याकडील प्लास्टिक विक्रीसाठी ठराविक कालावधी देणे आवश्यक आहे, असे विचार जिल्हा व्यापारी महासंघाच्या पदाधिकाºयांनी व्यक्त केले.
गुजरातमधील कॅरिबॅग उत्पादनावर बंदी आणा
५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या कॅरिबॅग गुजरात राज्यातील हालोल या गावात तयार केल्या जातात. तिथे सुमारे १५०० फॅक्टºया आहेत. देशभरात विक्री होणाºया ७० टक्के कॅरिबॅग हालोल येथेच तयार झालेल्या आहेत. सरकारने सर्वप्रथम गुजरातमधील कारखाने बंद करण्याचे धाडस दाखवावे. उत्पादन बंद झाले तर कॅरिबॅग विक्रीला येणारच नाही.
शेख नाजीम, सचिव प्लास्टिक शॉप असोसिएशन

Web Title: Above ...! Four tonnes of plastic sale every day in Aurangabad city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.