लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : जिल्ह्यात महावितरणने सुरू केलेल्या वसुली मोहिमेत थकबाकीदारांच्या वीज जोडण्या तोडण्यात येत होत्या. त्यावरून प्रचंड उद्रेकही झाला होता. परंतु त्यातून महावितरणला ७.९८ कोटी रुपयांची वसुली मिळाली आहे.
जिल्ह्यात ७७ हजार शेतकºयांकडे कृषीपंपाची ५३0 कोटी रुपयांची थकबाकी आहे. तर महावितरणची परिस्थिती बिकट झाल्याने थकबाकीसाठी थेट वीज जोडण्या तोडण्याचीच मोहीम महावितरणने हाती घेतली होती. त्यामुळे विविध पक्ष, संघटनांनी याविरोधात रान उठविले होते. ठिकठिकाणी याबाबत आंदोलने झाली होती. त्यानंतर १५ दिवसांची मुदत देवून हप्ते पाडून थकबाकी भरण्यास सांगितले होते. २९ हजार शेतकºयांनी ८ कोटी भरले. आता केवळ एक दिवसाची मुदत उरली असून यात हप्ते पाडून न घेतल्यास महावितरणकडून पुन्हा वीज जोडण्या तोडण्याची कारवाई होण्याची शक्यता आहे.