६५ गावांत देणार रास्त भाव दुकान

By Admin | Published: July 17, 2017 11:29 PM2017-07-17T23:29:52+5:302017-07-17T23:31:09+5:30

हिंगोली : वसमत उपविभागानंतर आता जिल्ह्यातील उर्वरित गावांतील रास्त भाव दुकानांसह केरोसिन विक्रीच्या परवान्यासाठी पुरवठा विभागाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत.

65 Shanti Pratishtha Shops Shop | ६५ गावांत देणार रास्त भाव दुकान

६५ गावांत देणार रास्त भाव दुकान

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : वसमत उपविभागानंतर आता जिल्ह्यातील उर्वरित गावांतील रास्त भाव दुकानांसह केरोसिन विक्रीच्या परवान्यासाठी पुरवठा विभागाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. महिला बचत गटांना यात प्राधान्य दिले जाणार असून यासाठी इतरही निकषपात्र लाभार्थी अर्ज करू शकणार आहेत.
हिंगोली जिल्ह्यात अनेक गावांत रास्त भाव दुकानांसह केरोसिन विक्रीचे परवाने बंद झालेले किंवा दिलेच नसल्याची परिस्थिती आहे. आता या गावांत अशी दुकाने देण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. काही ठिकाणी दोन्हीपैकी एक तर काही ठिकाणी धान्य व केरोसिन असे दोन्ही विक्रेते नेमले जाणार आहेत.
यात कळमनुरी तालुक्यातील सेलसुरा, नांदापूर-१ व २, दाभाडी, डोंगरगाव नाका, वारंगा फाटा-२, टाकळी का., गौळ बाजार-२, गंगापूर, आराटी, गारोळ्याची वाडी, उमरा, कांडली-२, माळेगाव, तुप्पा, झरा, भाटेगाव, जांभरुण, जटाळवाडी, चिखली-१ व २, हिवरा-२, डोंगरगाव पूल-, वसफळ, बिबथर, टव्हा, नरवाडी, शेनोडी, धानोरा ज., जांब, काळ्याची वाडी, घोडा-१ या ३२ गावांचा समावेश आहे. तर हिंगोली तालुक्यात जयपूरवाडी, चिंचपुरी, वाढोणा, करंजाळा, खंडाळा, इडोळी, बेलुरा, कापूरखेडा, गारमाळ, कनका, हिंगणी, सावरखेडा, सांडस, गिलोरी, व हिंगोलीत दोन परवाने दिले जाणार आहेत. सेनगाव तालुक्यात बोडखा, तांदूळवाडी, चांगेफळ, खैरी, मोहरखेडा, गोरेगाव, मन्नासपिंप्री, रेपा, सोनसावंगी, भगवती, पिंपरी, खैरखेडा, खुडज, कडोळी, तपोवन, तळणी या १५ गावांचा समावेश आहे.
यापूर्वीच प्रक्रिया सुरू झालेला मात्र अंतिम निवड जाहीर करण्याचे बाकी असलेली वसमत तालुक्यातील ४0 गावे आहेत. या गावांची पूर्ण प्रक्रिया झाली आहे. यात अर्ज सादर करणाऱ्या बचत गट व इतर लाभार्थ्यांना गुणांकन देण्यासाठी त्रयस्थ समिती नेमली होती. गुणांकन करताना त्यांनाही ठराविक बाबीच तपासायच्या होत्या. त्याला त्या तुलनेत गुण होते. त्यामुळे ही प्रक्रिया पूर्ण करून लवकरच ते पुन्हा महिलांच्या ग्रामसभेसमोर ठेवले जाणार आहेत. यात वसमत तालुक्यात हयातनगर, सोन्ना, आरळ, जुनुना, वसमत, कुरुंदवाडी, कुडाळा, सिंगी, करंजाळा, महमदपूरवाडी, पांग्रा संती, कोनाथा, पारवा/पळसगाव, खुदनापूर, बोराळा तर औंढा तालुक्यातील टाकळगव्हाण, टाकळगव्हाण त. औंढा, धारखेडा, अजरसोंडा, टेंभूरदरा, हिवरखेडा, औंढा-३, वडचुना, वडद-१, जवळा बाजार-४, काकडदाभा, असोला त.औंढा क्र.२, साळणा, सावंगी, सावळी तांडा, सेंदूरसना, येळी, माथा, देवाळा त. औंढा, कामठा, दरेगाव, पाझरतांडा, वाळकी, फुलदाभा, असोल्याचा समावेश आहे.

Web Title: 65 Shanti Pratishtha Shops Shop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.