औरंगाबादेतून ५०० टन कचरा उचलला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 12:39 AM2018-04-26T00:39:02+5:302018-04-26T00:39:53+5:30

कचराप्रश्नी बुधवारी संपूर्ण महापालिकेने झोकून देऊन काम केले. त्यामुळे दिवसभरात ५०० टनांहून अधिक कचरा उचलण्यात यश आले. महापौरांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिलेल्या शब्दाप्रमाणे सहाव्या दिवशी २५ टक्के प्रक्रिया केलेला कचरा उचलला.

500 tonnes of garbage picked up from Aurangabad | औरंगाबादेतून ५०० टन कचरा उचलला

औरंगाबादेतून ५०० टन कचरा उचलला

googlenewsNext
ठळक मुद्देचार दिवस शिल्लक : झाल्टा येथे विरोध; पोलीस कुमक मागविली

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : कचराप्रश्नी बुधवारी संपूर्ण महापालिकेने झोकून देऊन काम केले. त्यामुळे दिवसभरात ५०० टनांहून अधिक कचरा उचलण्यात यश आले. महापौरांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिलेल्या शब्दाप्रमाणे सहाव्या दिवशी २५ टक्के प्रक्रिया केलेला कचरा उचलला. येणाऱ्या दोन ते तीन दिवसांमध्ये शंभर टक्के कचरा उचलण्यात येणार असल्याचा दावा महापौरांकडून करण्यात आला. शहरातील कचरा झाल्टा येथे टाकण्यात येत असताना परिसरातील नागरिकांनी प्रखर विरोध दर्शविला. महापालिकेने अतिरिक्त पोलीस कुमक मागविल्याने विरोध मावळला.
शहरातील प्रमुख रस्त्यांवर आणि गल्लीबोळांत एकूण ५ हजार टन कचरा पडून आहे. उचलण्यात आलेला कचरा टाकायचा कुठे, असा प्रश्न सर्व वॉर्ड अधिकाºयांना पडला आहे. ज्या वॉर्डात ओला व सुका कचरा वेगळा करण्यात येतो तेथेच सुजलाम् सुफलाम् आहे. जिथे ओला व सुका मिक्स करून कचरा जमा करण्यात येतो तेथे प्रश्न गंभीर आहे. प्रभाग १, २, ३ आणि ९ मध्ये बुधवारी सकाळी ६ वाजेपासून व्यापक मोहीम राबविण्यात आली. जिथे मोठमोठे कचºयाचे डोंगर साचले आहेत तो कचरा उचलण्यास सुरुवात केली. किलेअर्क, समर्थनगर, पैठणगेट, जकात नाका, औरंगपुरा येथील कचरा उचलण्यात आला. हा सर्व प्रक्रिया केलेला कचरा आहे. या कचºयाचे स्क्रिनिंग झाल्टा येथे करण्याचे निश्चित झाले. दुपारी महापालिकेच्या आणि खाजगी कचºयाच्या गाड्या झाल्टा येथे पोहोचताच नागरिकांकडून प्रखर विरोध सुरू झाला.
येथे कचºयावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करण्यात येत असल्याचे अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, एम.बी. काझी, एस.एस. कुलकर्णी यांनी नागरिकांना सांगितले. नागरिक अजिबात ऐकून घेण्याच्या मन:स्थितीत नव्हते. प्रशासनाने त्वरित महापालिकेचे अतिक्रमण हटाव पथकही मागवून घेतले. त्यानंतरही नागरिकांचा विरोध सुरूच होता. मनपाने अतिरिक्त पोलीस कुमक मागवून घेतली. त्यानंतर नागरिकांचा विरोध मावळला. दिवसभरात २५ पेक्षा अधिक ट्रक कचरा या ठिकाणी टाकण्यात आला. रात्रीही कचरा टाकण्यात येणार आहे. नाशिकच्या कंपनीमार्फत कचºयाचे स्क्रिनिंग करण्यात येईल.

Web Title: 500 tonnes of garbage picked up from Aurangabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.