5 thieves in 10 days | १० दिवसांत ५ चोऱ्या
१० दिवसांत ५ चोऱ्या

लोकमत न्यूज नेटवर्क
पैठण : पैठण शहरातील पाटील प्लाझा या गजबजलेल्या मार्केटमधील गीता कलेक्शन या दुकानाचे कुलूप तोडून चोरट्यांनी दुकानातील तीन लाख रुपये किमतीच्या साड्या चोरून नेल्या. गेल्या १० दिवसांत शहरात पाच ठिकाणी चोºया करून चोरट्यांनी पैठण पोलिसांना आव्हान दिले आहे.
पैठण शहरातील पाटील प्लाझा या व्यावसायिक कॉम्प्लेक्समधील गीता कलेक्शन साडी दुकानाचे शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास तीन लाख ३० हजार २२४ रुपयांच्या किमती साड्या लंपास केल्या आहेत. याप्रकरणी दुकानदार रमेशअप्पा देवकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोमवारी रात्री पैठण पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रमेश देवकर सोमवारी सकाळी दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना दुकानाच्या शटरचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत बाजूला पडलेले दिसले. दुकानात जाऊन त्यांनी पाहिले असता दुकानातील रॅकमधील किमती साड्यांची चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी पैठण पोलीस ठाण्यात चोरी झाल्याची तक्रार नोंदवली. याबाबत पोलिसांनी मात्र ९५ हजार रुपयांचा माल चोरीस गेल्याची तक्रार नोंदवली, असे दुकानदार रमेश देवकर यांनी सांगितले. सोमवारी रात्री पोलिसांनी याबाबत अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास फौजदार विलास घुसिंगे हे करीत आहेत.


Web Title:  5 thieves in 10 days
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.