४0 हजार लिटर बाहेरचे दूध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 12:43 AM2017-10-06T00:43:40+5:302017-10-06T00:43:40+5:30

कोजागिरी पौणिमेनिमित्त शहरातील आठ ते दहा दूध केंद्रावर बाहेर गावावरुन तब्बल ४० ते ४२ हजार लिटर दूध दाखल झाले होते. ते खरेदी करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत नागरिकांची गर्दी झाल्याचे पहावयास मिळाले.

40 thousand liters of milk outdoors | ४0 हजार लिटर बाहेरचे दूध

४0 हजार लिटर बाहेरचे दूध

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : कोजागिरी पौणिमेनिमित्त शहरातील आठ ते दहा दूध केंद्रावर बाहेर गावावरुन तब्बल ४० ते ४२ हजार लिटर दूध दाखल झाले होते. ते खरेदी करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत नागरिकांची गर्दी झाल्याचे पहावयास मिळाले.
वर्षभरात रमजान ईद नंतर कोजागिरी पौर्णिमेला दुधाची सर्वाधिक जास्त विक्री होते. विशेष म्हणजे या दोन सणांसाठी दूध विक्रेत्यांकडे जवळपास २० ते २५ हजार लिटरपर्यंत पूर्वनोंदणीही केली जाते. तर कोजागिरी पौर्णिमेनिमित्त २० हजार लिटरची पूर्वनोंदणी झाल्याचे दीपक लदनिया यांनी सांगितले. या दोन सणांच्या व्यतिरिक्त शहरात नियमित १० ते १२ हजार लिटर दूध दाखल होते. मात्र कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तब्बल ४० ते ४२ लिटर दूध दाखल झाल्याने ते खरेदीसाठी रात्री साडेनऊ वाजेपर्यंत सारखीच गर्दी होती. ४० ते ४२ प्रति लिटर प्रमाणे विक्री होत होती. तसेच शहरात तब्बल ९ कंपनीचे दूध नियमित दाखल होते. त्यांच्या दरामध्ये १ ते २ रुपयाच्या फरक आहे. तसेच वरुन ठरवून दिलेल्या दराप्रामणेच दुधाची विक्री केली जाते. काधी काळी भावच वाढले तर संबंधित दूध विक्रेत्यांना भाववाढीचे पत्राद्वारे कळविण्यात येते. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होत नाही. मात्र ५ आॅक्टोबर रोजी सायंकाळच्या वेळेस पावसाने हजेरी लावल्यामुळे काही काळ ग्राहकांची संख्या कमी झाली होती. पुन्हा वातावरण बदलले अन् अनेकांनी कोजागिरीनिमित्त दूध घोटण्याचे नियोजन केले. अनेकांनी छतावरच त्याचे नियोजन करून गाण्यावर ठेकाही धरला होता.

Web Title: 40 thousand liters of milk outdoors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.