३२ प्रवासी बालंबाल बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 12:47 AM2017-08-28T00:47:30+5:302017-08-28T00:47:30+5:30

अजिंठा घाट उतरत असताना पुढील टायर फुटल्याने औरंगाबाद-भुसावळ एस.टी. बस बाजूच्या कठड्यावर धडकली. सुदैवाने यातील ३२ प्रवासी बालंबाल बचावल्याची घटना शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली.

 32 passenger Balanbal escaped | ३२ प्रवासी बालंबाल बचावले

३२ प्रवासी बालंबाल बचावले

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
फर्दापूर : अजिंठा घाट उतरत असताना पुढील टायर फुटल्याने औरंगाबाद-भुसावळ एस.टी. बस बाजूच्या कठड्यावर धडकली. सुदैवाने यातील ३२ प्रवासी बालंबाल बचावल्याची घटना शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली.
या घाटाखाली खोल दरी आहे, सुदैवाने बस कठड्यावर धडकली, अन्यथा मोठा अपघात झाला असता. अपघात झाला तेव्हा अंधार असल्याने प्रवासी कसरत करीत बाहेर पडले. या प्रवाशांना दुसºया बसमधून पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आले. अपघात झाल्यावर फर्दापूर पोलीस ठाण्याचे सपोनि. शरद जºहाड, फौजदार घोरपडे, पो. कॉ. राजू काकडे, मिर्झा, सुनील भिवसने, बाजीराव धनवट, कांबळे आदींनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. जळगाव -औरंगाबाद महामार्गावर बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे मोठमोठे खड्डे पडले असून यामुळे लहान मोठे अपघात नेहमी होत असतात. अजिंठा घाटात बºयाच ठिकाणी कठडे तुडलेले आहेत. वाहनचालक कसरत करीत वाहन चालवितात.

Web Title:  32 passenger Balanbal escaped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.