रामनगर येथे ३०० मि.मी.ची जलवाहिनी फुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 11:44 PM2019-04-17T23:44:01+5:302019-04-17T23:44:25+5:30

शहराच्या पाणीपुरवठ्यातील विघ्न संपायला तयार नाही. वादळी वाऱ्यामुळे जायकवाडी, फारोळ्यात वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर मनपाकडून शहराचा पाणीपुरवठा कसा सुरळीत होईल यावर भर देण्यात येत आहे. बुधवारी अचानक रामनगर येथे ३०० मि. मी. व्यासाची जलवाहिनी फुटली. त्यामुळे या भागातील तब्बल ३० हजारांहून अधिक नागरिकांचा पाणीपुरवठा उद्यावर ढकलण्यात आला आहे.

A 300 mm water pipeline rises in Ramnagar | रामनगर येथे ३०० मि.मी.ची जलवाहिनी फुटली

रामनगर येथे ३०० मि.मी.ची जलवाहिनी फुटली

googlenewsNext



औरंगाबाद : शहराच्या पाणीपुरवठ्यातील विघ्न संपायला तयार नाही. वादळी वाऱ्यामुळे जायकवाडी, फारोळ्यात वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर मनपाकडून शहराचा पाणीपुरवठा कसा सुरळीत होईल यावर भर देण्यात येत आहे. बुधवारी अचानक रामनगर येथे ३०० मि. मी. व्यासाची जलवाहिनी फुटली. त्यामुळे या भागातील तब्बल ३० हजारांहून अधिक नागरिकांचा पाणीपुरवठा उद्यावर ढकलण्यात आला आहे.
शहरातील बिघडलेले पाण्याचे वेळापत्रक पूर्वपदावर आणण्यासाठी पाणीपुरवठा विभागाचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. कधी वीज गुल झाल्याने तर कधी पाईपलाईन फुटल्याने पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. बुधवारी पाच दिवसांनंतर रामनगर, विठ्ठलनगर, प्रकाशनगर या भागांत पाणीपुरवठा करण्यात येणार होता. दुपारी पाणीपुरवठा सुरू करताच १२.३० वाजता रामनगर येथील कमानीजवळ पाईपलाईनचे जॉइंट निखळले. त्यामुळे हजारो लिटर पाणी नाल्यातून वाहून गेले. हा प्रकार लक्षात आल्यानंतर सिडकोतून पाणीपुरवठा बंद करण्यात आला. दरम्यान पाईपलाईनमधील पाणी संपल्यानंतर दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. बुधवारी होणारा पाणीपुरवठा आता गुरुवारी करण्यात येईल, असे पाणीपुरवठा विभागातर्फे कळविण्यात आले.
--------------

Web Title: A 300 mm water pipeline rises in Ramnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.