औरंगाबादेत विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या २९ सिटीबस; शाळेच्या वेळेनुसार सुरु आहे बससेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 03:58 PM2018-06-23T15:58:33+5:302018-06-23T16:05:01+5:30

विविध भागांतील शाळा, महाविद्यालये असलेल्या मार्गांवर त्यांच्या वेळेनुसार या बसेस सोडल्या जात आहेत.

29 Citybuses for students in Aurangabad; Bus service is started at the time of school | औरंगाबादेत विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या २९ सिटीबस; शाळेच्या वेळेनुसार सुरु आहे बससेवा

औरंगाबादेत विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या २९ सिटीबस; शाळेच्या वेळेनुसार सुरु आहे बससेवा

googlenewsNext
ठळक मुद्दे शहरातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांसाठी एसटी महामंडळाने २९ सिटीबस सुरू केल्या आहेत.

- राजेश भिसे 

औरंगाबाद : शहरातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांसाठी एसटी महामंडळाने २९ सिटीबस सुरू केल्या आहेत. विविध भागांतील शाळा, महाविद्यालये असलेल्या मार्गांवर त्यांच्या वेळेनुसार या बसेस सोडल्या जात आहेत. शहरातील मराठी, इंग्रजी व इतर माध्यमांच्या विविध शाळा व्यवस्थापनांशी संपर्क साधून अधिकाधिक विद्यार्थ्यांना ही सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

प्रदूषण, वाहतूककोंडी आदींवर उपाययोजना म्हणून सार्वजनिक वाहतुकीला शासनस्तरावरून प्रोत्साहन दिले जाते. याचाच एक भाग म्हणून शहरात विविध ठिकाणी एसटी महामंडळाची सिटीबस सेवा सुरू आहे. शहरात एसटी महामंडळाच्या १८ जूनपर्यंत १८ बसेस सुरू होत्या. शाळा, महाविद्यालये सुरू झाल्याने खास विद्यार्थ्यांसाठी ११ बसेस वाढविण्यात आलेल्या आहेत. विशेष म्हणजे या बसेस सकाळी ७, दुपारी १२, सायंकाळी ५ ते ५.३० यादरम्यान सिटीबस सोडण्यात येत आहेत. शहरातील बससेवा सुरूअसलेल्या विविध मार्गांवर जवळपास ३५ शाळा, महाविद्यालये आहेत, त्यामुळे या सेवेचा अधिकाधिक विद्यार्थ्यांना लाभ मिळावा यादृष्टीने सिडको आगाराच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत. गतवर्षी जुलै महिन्यात २३७, आॅगस्टमध्ये ३०७, सप्टेंबरमध्ये २२२ पासेस वितरित करण्यात आले होते. यंदा जाणीवपूर्वक प्रयत्न केले जणार असून, किमान एक हजार पासेस वितरित करण्याचा प्रयत्न असल्याचे सूत्रांनी सांगितले.

तर शाळेतच मिळणार विद्यार्थ्यांना पास
सिडको एसटी आगारातील अधिकाºयांनी विविध शाळांशी संपर्क साधून विद्यार्थ्यांची यादी मागवली आहे. शाळेतील किमान शंभर विद्यार्थी एसटीचा पास घेणार असतील तर एसटी महामंडळाचा कर्मचारी संबंधित शाळेत जाऊन पास तयार करून देईल, असे सूत्रांनी सांगितले. 

शाळा व्यवस्थापकांनी संपर्क साधावा
आतापर्यंत औरंगपुरा भागात ७०० अर्ज वितरित करण्यात आले आहेत, तर सिडको आगारातून २५० पासेस विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आलेले आहेत. आगामी पंधरा दिवसांत आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. शाळा व्यवस्थापनाने संपर्क साधल्यास त्यांना शाळेतच पासेस उपलब्ध करून देण्यात येतील.
- पी.पी. देशमुख, आगार प्रमुख, सिडको बसस्थानक, औरंगाबाद 

Web Title: 29 Citybuses for students in Aurangabad; Bus service is started at the time of school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.