सुट्यांमुळे तुंबले तब्बल २५ हजार धनादेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 01:19 AM2017-08-17T01:19:35+5:302017-08-17T01:19:35+5:30

सलग आलेल्या तीन सुट्यांमुळे बँकांमधील व्यवहार खोळंबले. निम्मे एटीएमसुद्धा रिकामे झाले होते.

25 thousand checks | सुट्यांमुळे तुंबले तब्बल २५ हजार धनादेश

सुट्यांमुळे तुंबले तब्बल २५ हजार धनादेश

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : सलग आलेल्या तीन सुट्यांमुळे बँकांमधील व्यवहार खोळंबले. निम्मे एटीएमसुद्धा रिकामे झाले होते. बुधवारी बँक उघडताच खातेदारांनी एकच गर्दी केली. आता पुन्हा गुरुवारी (दि.१७)‘पतेती’ असल्याने बँकांना सुटी राहणार आहे. मागील शुक्रवारी क्लिअरिंगसाठी दाखल केलेले सुमारे २५ हजार धनादेश सुट्यांमुळे अजूनही वटले नाहीत. रिझर्व्ह बँकेने मागील आठवड्यात बँकेला सव्वाशे ते दीडशे कोटी पाठविल्याने सध्या पैशाची अडचण मात्र नाही.
मागील आठवड्यात १२ आॅगस्टला दुसरा शनिवार, १३ आॅगस्टला रविवार असल्याने दोन दिवस बँका बंद होत्या. त्यानंतर १४ रोजी सोमवारी बँका सुरू होत्या. पुन्हा मंगळवारी १५ आॅगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त सुटी आली होती. अनेकांनी सुट्यांमुळे सहलीला जाण्याचे बेत आखले होते. अनेक सरकारी कर्मचारी, अधिकाºयांनी सोमवारची सुटी टाकली होती. यामुळे त्यांना सलग चार दिवस सुट्या मिळाल्या. सुट्यांमुळे बँकाही बंद राहणार असल्यामुळे अनेकांनी एटीएममधून पैसे काढणे सुरू केले. परिणामी रविवारी शहरातील निम्म्यापेक्षा अधिक एटीएम रिकामे झाले. सोमवारी बँका सुरू होत्या, पण एटीएममध्ये पुरेशी रक्कम जमा झाली नाही. त्यामुळे त्या दिवशी सायंकाळपर्यंत २५० पेक्षा अधिक एटीएममधील रक्कम संपली होती. एटीएममध्ये रक्कम नसल्याने अनेकांना मंगळवारी ध्वजवंदनानंतर सहलीला जाण्याचा बेत रद्द करावा लागला. सहलीच्या निमित्ताने बाहेरगावी गेलेल्या लोकांचेही तेथील एटीएम रिकामे झाल्याने हाल झाले.
बुधवारी सकाळी बँका सुरू झाल्या तेव्हा काही मिनिटांतच काऊंटरसमोर रांगा लागल्या. मात्र, पगारी आठवडा संपल्याने कमीच गर्दी दिसून आली. काऊंटरवर खातेदारांना आवश्यक रक्कम मिळत होती. यात १०० व ५०० रुपयांच्या नोटांचे प्रमाण अधिक होते.
एका बँक अधिकाºयाने सांगितले की, रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने ११ आॅगस्टला एसबीआयला ९६ कोटी रुपये तर अन्य तीन बँकांच्या करन्सीचेस्टला सर्व मिळून सुमारे दीडशे कोटी रुपये पाठविले. यामुळे शुक्रवारी बहुतांश एटीएममध्ये मुबलक पैसे होते. पण पैसे काढणाºयांची संख्या एवढी होती की, रविवारी एटीएम रिकामे झाले. शुक्रवारी सुमारे २५ हजार धनादेश बँकांमध्ये जमा झाले. ते आज सायंकाळपर्यंत वटविण्याचे काम सुरू होते. गुरुवारी सुटी आली आहे. त्यामुळे ज्यांनी मागील शुक्रवारी धनादेश बँकेत जमा केले, ते १८ रोजीच म्हणजे आठवडाभरानंतर संबंधितांच्या खात्यात जमा होतील. मात्र, ज्यांनी बुधवारी धनादेश जमा केले ते शुक्रवारी सायंकाळपर्यंत वटविले जातील.

Web Title: 25 thousand checks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.