वाळूज परिसरात ५ महिन्यांत २५ जणांनी संपवले जीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 07:55 PM2019-06-20T19:55:26+5:302019-06-20T19:57:36+5:30

आत्महत्या करणाऱ्यांमध्ये युवकांची संख्या मोठी 

25 people suicide in 5 months in the waluj area | वाळूज परिसरात ५ महिन्यांत २५ जणांनी संपवले जीवन

वाळूज परिसरात ५ महिन्यांत २५ जणांनी संपवले जीवन

googlenewsNext
ठळक मुद्देमहिन्याला सरासरी ५ आत्महत्यामानसिक ताणातून टोकाचे पाऊल

वाळूज महानगर (औरंगाबाद ) : वाळूज महानगर परिसरात दिवसेंदिवस आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. कौटुंबिक कलह, आर्थिक चणचण, आजारपण आदी कारणांच्या ताणतणावातून चालू वर्षातील गत पाच महिन्यांत तब्बल २५ जणांनी आत्महत्या करून आपले जीवन संपविल्याची धक्कादायक बाब पोलीस ठाण्यातील नोंदीवरून समोर आली आहे. विशेष म्हणजे यात २० ते ३० वर्षे वयोगटातील तरुणांचे प्रमाण अधिक असल्याने आत्महत्येचा विषय चिंतेचा बनला आहे. 

औद्योगिक क्षेत्रामुळे बहुभाषक व बहुसांस्कृतिक ओळख निर्माण झालेल्या वाळूज महानगरात गुन्हेगारीच्या घटना सातत्याने घडत आहेत. याबरोबरच आता आत्महत्येचे प्रकार वाढल्याचे पोलीस दप्तरीच्या नोंदी दर्शवीत आहेत. या भागात बहुतांशी कामगार वर्ग वास्तव्यास आहे. कामानिमित्त घरदार सोडून आलेल्या कुटुंबाला उदरनिर्वाहासाठी अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. आर्थिक चणचणीमुळे कौटुंबिक वाद, व्यसनाधीनता वाढते. शिवाय सहनशीलताही घटते. कौटुंबिक कलह, आर्थिक चणचण, आजारपण, दारू, भीती, पे्रमभंग आदी कारणांच्या मानसिक ताणतणावातून अल्पवयीन शाळकरी मुलांबरोबरच तरुण-तरुणी व महिला-पुरुष आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत. 

वाळूज एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील बजाजनगर, वडगाव कोल्हाटी, जोगेश्वरी, रांजणगाव, साजापूर, विटावा, कमळापूर आदी भागांतील २५ जणांनी गळफास व विषारी औषधी प्राशन करून आत्महत्या केली आहे. यात दोन अल्पवयीन शाळकरी विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.
विशेष म्हणजे या आत्महत्या करणाऱ्यांमध्ये सर्वाधिक प्रमाण २० ते ३० वर्षे वयोगटातील तरुण-तरुणींचे आहे. मानसिक तणाव हे आत्महत्येमागचे मूळ कारण असल्याचे तज्ज्ञ व्यक्तींकडून सांगितले जाते. मानसिकदृष्ट्या खचलेल्या मनामुळे आत्महत्येचे सारखे विचार सतत येत असल्याने, अशा व्यक्तींची वेळीच दखल घेतली गेली नाही, तर त्याचा गंभीर परिणाम होऊ शकतो. आजच्या युवा पिढीत सहनशीलतेचा अभाव आहे. 

महिन्याला सरासरी ५ आत्महत्या
चालू वर्षात पहिल्या ५ महिन्यांतच १६ पुरुष व ९ महिला, अशा एकूण तब्बल २५ जणांनी आत्महत्या केली. यात दोन अल्पवयीन असून, तब्बल १४ जण २० ते ३० वर्षे या वयोगटातील आहेत. उर्वरित ३१ ते ४५ या वयोगटातील आहेत. मानसिक तणावातून दर महिन्याला सरासरी ५ जण आत्महत्या करून आपले जीवन संपवीत आहेत. शाळकरी विद्यार्थी, महाविद्यालयीन तरुण-तरुणी यांना तणावमुक्त ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी स्थानिक पातळीवर चर्चासत्र, व्याख्याने आयोजित करून तरुण वर्गाला मार्गदर्शन करणे आवश्यक झाले आहे. 

यांनी केली आत्महत्या
आत्महत्या करणाऱ्यांत स्वप्नील काटकर, युवराज जगदाळे, गुंजन निशाद, रघुनाथ गाजरे, मीना जोगदंड, गणेश खुने, संजय पाटील, सुरेश वानखेडे, माया चव्हाण, पवन जंजाळ, गणेश सोनवणे, राजेंद्र निकम, संगीता राऊत, सुनीता टेकाळे, लक्ष्मीकांत धारासूरकर, रिजवान चाऊस, गणेश त्रिभुवन, अनुष्का डोळस, परमेश्वर मार्कंडे, मनीषा मोरे, शारदा ढवळे, सुनील भोटकर, विशाल व्यवहारे, शाहेदाबानू माजीद, पुंडलिक सोनाळे यांचा समावेश आहे.
 

Web Title: 25 people suicide in 5 months in the waluj area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.