दोन दिवसांत २२ हजार शोषखड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 11:55 PM2017-08-16T23:55:27+5:302017-08-16T23:55:27+5:30

स्वच्छ भारत मिशन ग्रामीण या अभियानाला गती देण्यासाठी जिल्ह्यात मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात २२ हजार १७ शौचालयांचे शोषखड्डे तयार करण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली़

22 thousand shows in two days | दोन दिवसांत २२ हजार शोषखड्डे

दोन दिवसांत २२ हजार शोषखड्डे

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: स्वच्छ भारत मिशन ग्रामीण या अभियानाला गती देण्यासाठी जिल्ह्यात मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात २२ हजार १७ शौचालयांचे शोषखड्डे तयार करण्यात आल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली़
येत्या मार्च २०१८ अखेर संपूर्ण महाराष्ट्र हागणदारीमुक्त करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यानुसार जिल्ह्यात या अभियानाला गती मिळण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांनी जिल्ह्यातील १४० मोठ्या ग्रामपंचायतीमधून विशेष मोहीम राबवून १० व ११ आॅगस्ट या दोन दिवसांत सुमारे २२ हजार १७ शौचालयांचे शोषखड्डे करण्यात आले आहेत. त्यापैकी प्रत्यक्षात १० हजार शौचालय बांधकामे पूर्णत्वास आली आहेत. या अभिनव उपक्रमामुळे स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अभियानाला चालना मिळाली असल्याचे अनेक सरपंचांनी सांगितले आहे.
या उपक्रमातून किनवट तालुक्यात १ हजार १२६ शोषखड्डे तयार करण्यात आले आहेत, हिमायतनगर- ९९१, नायगाव- ४०७, बिलोली- ५९३, देगलूर- १ हजार २९१, धमार्बाद- ८९९, हदगाव- २ हजार २४६, माहूर- १ हजार ५६२, भोकर- ६३४, लोहा- १ हजार ८८६, कंधार- १ हजार ५११, मुखेड- १ हजार ६३६, नांदेड- १ हजार ५४२ आणि उमरी तालुक्यातील ६४८ शौचालयांची शोषखड्डे तयार करण्यात आली आहेत. यापूर्वी अर्धापूूर व मुदखेड तालुका शंभर टक्के हागणदारीमुक्त झाला असून उर्वरित १४ तालुक्यांतील १४० मोठ्या ग्रामपंचायतीमधून ही मोहीम राबविण्यात आली आहे. या १४० ग्रामपंचायतींमधून आॅगस्टअखेर ५८ हजार १०६ शौचालयांचे उद्दिष्ट साध्य करण्यात येणार आहे. आतापर्यंत चालू वर्षात २४ हजार ९९७ शौचालयांची निर्मिती करण्यात आली आहे. सदर ग्रामपंचायतीमधून शौचालयाची कामे पूर्ण करावीत, अशा सूचना गटविकास अधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.
शौचालय बांधकामानंतर त्याच्या वापरासाठी गुड मॉर्निंग पथकाची स्थापना केली जाणार असून ज्या लाभार्थ्यांकडे शौचालय असूनही त्याचा वापर होत नसेल तर त्यांच्याविरुद्ध मुंबई पोलीस अधिनियम अन्वये १२०० रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांनी सांगितले.

Web Title: 22 thousand shows in two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.