लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगोली : वाहन ४.० प्रणालीवरील विविध प्रकारच्या १६ सेवा आता आॅनलाईन सुरू करण्यात आल्या आहेत. याबाबत उपप्रादेशिक परिवहन विभाग हिंगोली यांना सदर सेवेविषयी मुंबई परिवहन आयुक्तांनी कळविले असून प्रणालीचा वापर कशाप्रकारे करावा याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.
वाहनांचे हस्तांतरण, एनओसी, बँकेचा बोजा कमी करणे अथवा बोजा चढविणे, आरसी इन्फॉरमेशन, वाहन नोंदणीचा पत्ता बदलणे, डुप्लीकेट आरसी, वाहनात बदल (बीटीबीटीआय), कन्व्हर्शन व्हेहीकल, डुप्लिकेट फिटनेस व नवीन फिटनेसकरिता अर्ज करणे, तसेच वाहनांचा कर भरणे आदी सुविणा करीता आता आॅनलाईन अर्ज करणे शक्य होणार आहे. त्याअनुषंगाने सदर सेवेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी आॅनलाईन अर्ज व फी भरणा करून अर्जाच्या प्रिंटसोबत वाहनांची मूळ कागदपत्रे कार्यालयात सादर करावी लागणार आहेत. सदर सुविधेमुळे आता घरबसल्या अर्ज करणे शक्य झाले आहे. शिवाय कुठल्याही मध्यस्थी व्यक्तीची आवश्यकता नाही. नागरिकांना सेवेचा लाभ घेणे सोपे व्हावे यासाठी वाहन ४.० प्रणालीवर आॅनलाईन अर्ज कसे करावेत याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. या संदर्भात १६ नोव्हेंबर रोजी दुपारी ४ वाजता हिंगोली येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येथे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यशाळेस नागरिक, वाहन वितरक, वाहनचालक व मालक यांनी जास्तीत-जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक पवार यांनी केले.