‘१५ ऑगस्ट’ लघुपट ठरला लंडनच्या महोत्सवात सर्वोत्कृष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 06:15 PM2019-05-09T18:15:19+5:302019-05-09T18:19:07+5:30

या महोत्सवासाठी ८४ देशांतील ६०० लघुपटांची निवड झाली होती.

'15th August 'is the best short film in the London Festival | ‘१५ ऑगस्ट’ लघुपट ठरला लंडनच्या महोत्सवात सर्वोत्कृष्ट

‘१५ ऑगस्ट’ लघुपट ठरला लंडनच्या महोत्सवात सर्वोत्कृष्ट

googlenewsNext
ठळक मुद्देयामध्ये प्रा. साळवे यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून मानांकनदेहविक्रय करणाऱ्या समाजाची  कथा या लघुपटात मांडली.

औरंगाबाद : प्रा. अनिलकुमार साळवे लिखित तथा दिग्दर्शित  ‘१५ आॅगस्ट’ या लघुपटाला लंडन येथील न्यूलीन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट लघुपट  ठरला. मराठवाड्यातील कलावंतांचा गौरव होण्याची ही प्रथम वेळ आहे.

देवगिरी महाविद्यालयात नाट्यशास्त्र विभागाचे प्रमुख  प्रा. अनिलकुमार साळवे यांचा हा लघुपट महोत्सवात दाखविल्यानंतर उपस्थितांनी त्याला ‘स्टँडिंग ओव्हेशन’ दिले. या महोत्सवासाठी ८४ देशांतील ६०० लघुपटांची निवड झाली होती. सर्वोत्तम ५० लघुपट रसिकांना दाखविले.  दि. ७ एप्रिलला पुरस्कार प्रदान झाले. देहविक्रय करणाऱ्या समाजाची  कथा या लघुपटात मांडली.  या लघुपटाची अमेरिकेतील लॉस एंजलिस आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सव व ब्रॅसन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात निवड झाली आहे. यामध्ये प्रा. साळवे यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून, तर सर्वोत्कृष्ट बालकलाकार म्हणून राहुल कांबळे यांना मानांकन मिळाले आहे.
 

Web Title: '15th August 'is the best short film in the London Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.