श्री गुरू गोविंदसिंघजी जयंतीसाठी १५० कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2017 01:09 AM2017-11-17T01:09:10+5:302017-11-17T01:09:24+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नांदेड: श्री गुरू गोविंदसिंघजी महाराज यांच्या ३५० व्या जयंती उत्सवासाठी केंद्र व राज्य शासनाने १५० कोटी ...

150 million for Shri Guru Gobind Singh ji | श्री गुरू गोविंदसिंघजी जयंतीसाठी १५० कोटी

श्री गुरू गोविंदसिंघजी जयंतीसाठी १५० कोटी

googlenewsNext
ठळक मुद्देतारासिंघ: विकास कामे हाती घेणार




लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: श्री गुरू गोविंदसिंघजी महाराज यांच्या ३५० व्या जयंती उत्सवासाठी केंद्र व राज्य शासनाने १५० कोटी रूपये निधी मंजूर केला असून या निधीद्वारे विविध विकास कामे हाती घेतले जाणार आहेत, अशी माहिती सचखंड गुरुद्वारा कमिटीचे अध्यक्ष आ. सरदार तारासिंघ यांनी दिली़
३१ डिसेंबर २०१७ रोजी श्री गुरू गोविंदसिंघजी महाराज यांचा ३५० वा जन्मोत्सव साजरा होणार आहे़ त्यासाठी सचखंड गुरूद्वारा बोर्डच्या वतीने विविध धार्मिक व सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे़ यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून दीडशे कोटींचा निधीही उपलब्ध होणार आहे़ यासंदर्भात माहिती देताना गुरूद्वारा कमिटीचे अध्यक्ष आ़ सरदार तारासिंघ म्हणाले, मुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ३१ डिसेंबर रोजी सचखंड गुरूद्वाराच्या स्वर्ण सेवेला प्रारंभ होईल़ या दिवशी मुख्यमंत्र्याच्या हस्ते स्वर्ण कलश गुरूद्वारा येथे स्थापन केले जाईल़ त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भव्य जयंती सोहळा पार पडणार आहे़ यावेळी किर्तन दरबारचे आायोजन केले आहे़ जयंती उत्सवासाठी देश, विदेशातील भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती राहणार आहे़ दरम्यान, शासनाला गुरूद्वारा बोर्डाची जमीन देण्यासाठी स्थानिक शिख समाजाच्या विरोधाचे समर्थन करताना ते म्हणाले, यापुढे गुरूद्वारा बोर्डाची एक इंच जमीनही शासनाला दिली जाणार नाही़ यापूर्वी गुरूद्वारा बोर्डाच्यावतीने विविध उपक्रमासाठी शासनाला १६२ एकर जमिनी देण्यात आली आहे़ मात्र कसलाही मोबदला मिळालेला नाही़

Web Title: 150 million for Shri Guru Gobind Singh ji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.