14 वर्षीय भोळसर मुलाचा गच्चीवरून पडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क on Fri, November 10, 2017 4:01pm

14 वर्षीय भोळसर मुलाचा राहत्या घरावरील दुसऱ्या मजल्याच्या गच्चीवरून  पडून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास मयुरपार्क येथील मारोतीनगर मध्ये घडली .

औरंगाबाद : 14 वर्षीय भोळसर मुलाचा राहत्या घरावरील दुसऱ्या मजल्याच्या गच्चीवरून  पडून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी 10 वाजेच्या सुमारास मयुरपार्क येथील मारोतीनगर मध्ये घडली . या घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे . शैलेश कैलास सोनवणे (वय 14) असे मृत मुलाचे नाव आहे .

पोलीस आणि नातेवाईकांनी दिलेली अधिक माहिती अशी की,  शैलेशचे वडील हे माजी सैनिक असून ते मयूर पार्क येथे राहतात. शैलेश हा स्वभावाने भोळसर आहे. यासाठी त्याच्यावर सैनिकी रुग्णालयात उपचार  देखील सुरू होते. आज सकाळी शैलेशने आई वडिलांसोबत दुस-या मजल्यावर बसून चहा घेतला. त्यानंतर आई वडील दोघेही आपापल्या कामात व्यग्र  झाले. काही वेळाने अचानक काहीतरी खाली कोसळण्याचा आवाज झाला. आवाज ऐकून आई- वडील दोघेही गॅलरीत आले असता शुभम रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडलेला दिसला. 

सोनवणे यांनी लागलीच शैलेश याला शेजाऱ्यांच्या मदतीने घराजवळील खाजगी रुग्णालयात हलविले. तो गंभीर जखमी असल्याने त्यास त्याला घाटी येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहचण्या आधीच शैलेशची प्राणज्योत मालवली. वैधकीय अधिकाऱ्यांनी त्यांला तपासून मयत घोषित केले. या प्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात घटनेची नोंद घेण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर हे करीत आहेत.  

संबंधित

गुढीपाडव्यामुळे फुलांच्या दरात ५० टक्के वाढ
भांडण सोडविणार्‍या पोलिसाच्या डोक्यात घातला दगड
लोणीकाळभोर येथे चोरट्यांनी केला पंधरा तोळे सोन्याचा ऐवज लंपास 
१०८ रुग्णवाहिका ठरली ३५२० रुग्णांसाठी संजीवनी
जालना जिल्ह्यात उन्हाळ्यात पावसाळी वातावरण

औरंगाबाद कडून आणखी

गुडईअर, सार्वजनिक बांधकाम संघ विजयी
केम्ब्रिज, सेंट लॉरेन्स, एस.बी.ए. संघ विजयी
जालना जिल्ह्यात उन्हाळ्यात पावसाळी वातावरण
भोकरदन तालुक्यात अवैध पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाई
जालन्यात व्याज आकारणी सुरूच

आणखी वाचा