अ.भा. आंतरविद्यापीठ धावण्याची स्पर्धा : सुवर्णपदक पटकावत संजीवनीकडून नव्या विक्रमाची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 10:09 PM2017-12-15T22:09:41+5:302017-12-15T22:11:26+5:30

नाशिक : गुंटूर (आंध्र प्रदेश) येथे सुरू असलेल्या ७८ व्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ धावण्याच्या स्पर्धेत नाशिकची धावपटू संजीवनी जाधव आणि रणजित कुमार यांनी सुवर्णपदक पटकावले असून, आरती पाटील हिने कांस्यपदक पटकावले.

AB Intermediate Runner-up Competition: Sanjivan has won a gold medal in a new record | अ.भा. आंतरविद्यापीठ धावण्याची स्पर्धा : सुवर्णपदक पटकावत संजीवनीकडून नव्या विक्रमाची नोंद

अ.भा. आंतरविद्यापीठ धावण्याची स्पर्धा : सुवर्णपदक पटकावत संजीवनीकडून नव्या विक्रमाची नोंद

Next
ठळक मुद्देरणजित कुमारला सुवर्ण, तर आरतीला कांस्य

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : गुंटूर (आंध्र प्रदेश) येथे सुरू असलेल्या ७८ व्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ धावण्याच्या स्पर्धेत नाशिकची धावपटू संजीवनी जाधव आणि रणजित कुमार यांनी सुवर्णपदक पटकावले असून, आरती पाटील हिने कांस्यपदक पटकावले.
खुल्या गटात दहा हजार मीटर धावण्याच्या या स्पर्धेत संजीवनी जाधव हिने ३३.१४.१६ या विक्रमी वेळेत हे अंतर यशस्वीरीत्या पूर्ण करून याआधी केलेला (३३.३३) विक्रम मोडीत काढत सुवर्णपदकावर आपले नाव कोरले असून, रणजित कुमार यानेदेखील पुरुषांच्या गटात २९.४५.८१ अशी वेळ नोंदवत सुवर्णपदक आपल्या नावावर केले.
नाशिकच्या धावपटूंनी दोन सुवर्णपदकांची कमाई केली असली, तरी आरती पाटील या नाशिकच्याच धावपटूला मात्र कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.स्पर्धेत बक्षिसांची लयलूट करणा-या नाशिकच्या धावपटूंना प्रशिक्षक विजेंदर सिंग यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: AB Intermediate Runner-up Competition: Sanjivan has won a gold medal in a new record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.