लाइव न्यूज़

All post in लाइव न्यूज़

कन्या

आज

१९ मार्च २०१८

आठवड्याचे भविष्य

आठवडय़ाच्या सुरुवातीलाच घरात आनंदाचे वातावरण असेल. कार्यक्षेत्रातसुध्दा तुमची हुकूमत राहील, शब्दाला वजन असेल. सहकाऱ्यांकडून लाभ होतील. आर्थिक लाभ चांगले होतील मात्र अशा व्यवहारात सावधानता बाळगा. आत्मविश्वास वाढवा. कलागुणांचा गुणगौरव होईल. प्रवासाचे, सहलीचे योग येतील. संततीचा उत्कर्ष काळ. घरातील वडिलधाऱ्या मंडळींची काळजी घ्या. नातेवाईक किंवा कुटुंबातील व्यक्तिबरोबर न पटल्याने दुरावा येऊ शकतो, गोड बोलून कामे साधा. वेळेचा अपव्यय होणार याची दक्षता घ्या. मित्र व सहकारी यांच्याशी सौहार्दता बाळगा. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. विद्याथ्र्याचे कोडकौतुक केले जाईल. सरकारी नियम व कायदे यांचे पालन करा. साहस-स्पर्धा टाळा. प्रत्येक टप्प्यावर दक्ष राहा.
शुभदिनांक 18,19

मासिक भविष्य

आपल्या बोलण्यामुळे कोणीही दुखावणार नाही याची काळजी घ्या. आपल्या कौटुंबिक जबाबदा:या पार पाडताना तारेवरची कसरत होणार आहे. तब्येतीची काळजी घ्या. मानसिक थकवा जाणवेल. आपल्या अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल.  कवी, कलाकार, गायक, वादक यांना चांगल्या संधी लाभतील. लेखक, साहित्यिकांच्या हातून दर्जेदार लिखाण होईल. आपल्या जोडीदारावर आपल्या मतांचा पगडा राहील. जुन्या स्मृतींना उजाळा मिळेल. नवीन व्यावसायिक करार करताना तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्या.  यशस्वी होण्यासाठी इतरांवर अवलंबून राहू नका. स्वत:चे प्रयत्न स्वत:च करावेत.  व्यवसाय उद्योगाच्या निमित्ताने देशातील तसेच परदेशातील संस्थांशी संपर्क साधण्यात यशस्वी व्हाल. प्रलोभनातून आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता राहते. हितशत्रूंच्या कारवायांवर मात कराल. तरुणांच्या कौशल्याला चांगला वाव मिळेल. स्वत:ची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी सतत कार्यरत  प्रयत्नशील राहाल. आपल्या बुद्घीचातुर्यावर मोठी मजल माराल. रचनात्मक कामातून लाभ होतील. आत्मविश्वास व मनोबल उत्तम राहील. नवनवीन प्रकल्प हाती घेऊन यशस्वीपणो पूर्ण कराल. सार्वजनिक संबंधाच्या प्रश्नांशी सतत संबंध येतील. त्यातूनच समाजात नांवलौकिक वाढेल.
 

प्रमोटेड बातम्या